Close

कतरीना आणि विकी कौशलमध्ये कोण आहे आळशी, अभिनेत्यानेच दिले खरे उत्तर ( Vicky Kaushal Revealed Who Is Lazy In Between Katrina And Him )

बॉलिवूड स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. विकी अनेकदा वेगवेगळ्या मुलाखतीतून आपल्या वैवाहिक आयुष्यावर चर्चा करत असतो. अशात एका कार्यक्रमात त्याने आपल्या बायकोसोबत सुट्टी कशी घालवतो याबद्दल सांगितले.

बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार जोडप्यांपैकी एक म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशलची जोडी. काल म्हणजेच 9 डिसेंबर रोजी विकी आणि कतरिनाच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2 वर्षांपूर्वी याच दिवशी विकी आणि कतरिनाचे राजस्थानमध्ये थाटामाटात लग्न झाले होते.

मुलाखतीत विकी कौशलने सांगितले की, जेव्हा त्याला शूटिंग नसते आणि तो घरी असतो तेव्हा तो काय करतो. एका एंटरटेनमेंट साईटवर बोलत असताना विकीला विचारण्यात आले की, दोघांमध्ये सर्वात आळशी कोण आहे.

तर अभिनेत्याने सांगितले की जर मी शूटिंगसाठी गेलो नाही आणि जर मी घरी असेल तर मी खूप आळशी माणूस आहे. तर कतरिना अतिशय शिस्तप्रिय आहे. पण जेव्हा आम्ही दोघे घरी एकत्र असतो, तेव्हा आम्ही शांत असतो. आम्ही घराबाहेर अजिबात जात नाही. काही कामासाठी बाहेर जावं लागलं तर आम्हा दोघे आळशी होतो.

पण ते खूप चांगले आहे. खरं तर, सुट्टी ही दोन आळशी लोकांची पार्टी असते. जेव्हा कतरिनाला शिस्तित नसते तेव्हा ती राक्षस बनते.

विकीने सांगितले की पत्नी कतरिनाला खुश करणे सोपे नाही. काही बाबतींत ते अतिशय निवडक असते, विशेषत: अन्न आणि कपड्यांबाबत. काही गोष्टींमध्ये ती खूप वेगळी असते.

Share this article