Close

यामुळे विद्या बालन करत नाही नवऱ्यासोबत काम, तो चित्रपट ठरला कारण ( Vidya Balan does not work with her husband Siddharth Roy Kapur Because of His Flopp Movie)

विद्या बालनच्या नावावर बी-टाऊनमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट आहेत. तिचा पतीही सिद्धार्थ रॉय कपूरही तिला तोडीस तोड आहे.  कॅमेऱ्यासमोर दिसत नसला तरी पडद्यामागे तो उत्तम चित्रपट तयार करतो. एक अभिनेत्री आहे आणि दुसरी निर्माता अशी दोघांची जोडीही खास आहे.  पण तरीही विद्या बालनला तिच्या पतीने बनवलेल्या चित्रपटांमध्ये काम करायला आवडत नाही. यामागे एक खास कारण आहे.

या प्रश्नाचे उत्तर विद्या बालनने फिल्म कंपेनियन या चॅट शोमध्ये दिले होते. निर्मात्या पतीसोबत काम करायला आवडेल का, असा प्रश्न विचारला असता विद्या बालनने थेट नाही म्हटलं. कारण विद्या बालन पुढे म्हणाली की, ती आणि सिद्धार्थ रॉय कपूर या दोघांनीही एकत्र कोणताही चित्रपट करणार नसल्याचे ठरवले आहे. विद्याने गंमतीने असेही सांगितले की, माझा नवरा माझ्यापेक्षा दुसरीकडे जास्त लक्ष देतो किंवा जर मी तिथे गेले तर तो माझ्यापेक्षा कुणाला जास्त फी देतो हे सेटवर दिसेल त्यामुळे मला एकत्र काम करायला आवडत नाही.

विद्या बालनने सांगितले की, घनचक्कर चित्रपटानंतर दोघांनीही एकत्र काम केले नाही. या चित्रपटात विद्या बालन हिरोईन तर सिद्धार्थ रॉय कपूर निर्माता होता. एकत्र काम न करण्यामागचे कारण म्हणजे हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला. विद्या बालन म्हणते की, जेव्हा हा चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा दोघेही दु:खी झाले होते, त्यानंतर त्यांनी ठरवले की ते वेगळे चित्रपट करायचे जेणेकरून चित्रपट अयशस्वी झाला तर घरात त्यांना साथ देणारे कोणीतरी असेल.

Share this article