हिंदी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखाने राकेश रोशनसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि पडद्यावर या दोघांनाही पसंती मिळाली होती, राकेश यांचा मुलगा हृतिक रोशनने रेखासोबत 'कोई मिल गया' या चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये रेखाने हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती. हृतिक रोशनच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेला 'कोई मिल गया' रिलीज होऊन 20 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाशी एक रंजक किस्साही जोडला गेला आहे, रेखाने एकदा हृतिकला जोरदार कानाखाली मारली होती, याचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
या चित्रपटात हृतिक रोशनसोबत प्रीती झिंटा दिसलेली, पण तिच्या आधी निर्मात्यांची पसंती दुसरीच होती. असे म्हटले जाते की, प्रितीच्या आधी राकेश रोशनने करीना कपूर आणि ऐश्वर्या राय यांना निशाच्या भूमिकेसाठी अप्रोच केले होते, पण नंतर प्रिती झिंटाला त्यासाठी फायनल करण्यात आले.
बॉक्स ऑफिसवर 'कोई मिल गया' रिलीज झाला तेव्हा त्याने यशाचे सर्व रेकॉर्ड तोडले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा चित्रपट सर्वांच्याच पसंतीस उतरला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा जी यांच्यासोबत काम करत असल्यामुळे हृतिक घरून रिहर्स करुन जात असे.
एके दिवशी हृतिक सर्व तयारी करून सेटवर पोहोचला, पण तिथे पोहोचल्यानंतर त्याला समजले की, ज्या सीनसाठी त्याने रिहर्सल केली होती त्याचे शूटिंग त्या दिवशी होणार नव्हते. परिस्थितीत त्याच्यासाठी खूप कठीण झाली. खरं तर त्या दिवशी रेखा ह्रतिकला कानाखाली मारतात तेव्हा मी इतरांसारखा सामान्य का नाही असे विचारतो. हा सीन शूट होणार होता.
हृतिकने एका मुलाखतीत सांगितले होते की, कानाखाली मारल्यानंतर रेखा त्याला फ्लॅशबॅक स्टोरी सांगते, परंतु सीनची तयारी नसल्यामुळे काही गैरसमज झाले होते. हृतिकने सांगितले की, सेटवर पोहोचल्यानंतर जेव्हा स्क्रिप्ट हातात आली तेव्हा दृश्य वेगळे होते. स्क्रिप्ट पाहून तो परत आपल्या गाडीकडे आला आणि ४५ मिनिटे बाहेर आलाच नाही. एवढेच नाही तर तो खूप घाबरला होता.
हृतिकला त्याच्या वडिलांनी सांगितले होते की हा सीन चित्रपटातील खूप खास आहे, कारण या सीनमध्ये सर्व काही ऐकल्यानंतर जादूने रोहितला मदत करण्याचा निर्णय घेतलेला असतो. हृतिक या सीनसाठी तयार नव्हता, पण त्या सीनच्या शूटिंगदरम्यान रेखाने हृतिकला खरच कानाखाली मारली, ज्यामुळे त्याच्या सर्व भावना बाहेर आल्या आणि तो सीन एकदम परफेक्ट झाला. हा सीन परफेक्ट करण्यासाठी रेखाने हृतिकला खरच कानाखाली मारली होती.