एकीकडे, खिलाडी कुमारने वर्षभरात एकामागून एक चित्रपटांचा सपाटा लावला आहे तर, दुसरीकडे, शाहिद कपूर चित्रपटांच्या बाबतीत खूप निवडक म्हणून ओळखला जात आहे. इंडस्ट्रीतील हिट अभिनेत्यांपैकी एक असलेला शाहिद कपूर एका वर्षात फक्त दोन चित्रपट किंवा वेब सीरिज करण्यास प्राधान्य देतो. अलीकडेच एका मुलाखतीत शाहीदने नाव न घेता अक्षय कुमारवर निशाणा साधला आणि तो बनावट मिशी चिकटवून चित्रपट करू शकत नाही, असे सांगितले. यासोबतच तो एका वर्षात अनेक चित्रपट का करत नाही आणि तो त्याच्या चित्रपटांबाबत इतका निवडक का आहे, हे सांगितले.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शाहिद कपूरने जास्त चित्रपट न करणे आणि या बाबतीत निवडक असण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, हा एक अतिशय आश्चर्यकारक प्रश्न आहे, कारण मी देखील स्वतःला हाच प्रश्न अनेकवेळा विचारतो, प्रत्येकाचे याबाबतील उत्तर वेगळे असू शकते. प्रत्येकाचे जीवन देखील भिन्न आहे. तो म्हणाला की, मी आणखी चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण बनावट मिशा लावून मी चित्रपट करू शकत नाही.
शाहीद कपूर म्हणाला की, मी एका वेळी एकच चित्रपट करतो, जेणेकरून वर्षातून दोन चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करता येईल. अभिनेत्याने सांगितले की या वर्षी त्याच्याकडे दोन प्रोजेक्ट आहेत, परंतु जर त्याला त्याच्या कामाबद्दल आवड नसेल तर तो चित्रपटाच्या सेटवर देखील जाऊ शकत नाही. तुम्ही वर्षभरात कमी चित्रपट करा, पण तुम्ही तुमचे काम पूर्ण उत्कटतेने केले पाहिजे.
शाहिदच्या म्हणण्यानुसार, त्याचे फक्त एक कुटुंब आहे, त्यांच्यासाठी पैसे कमवायचे आहेत आणि घर चालवायचे आहे या विचाराने तो चित्रपटाच्या सेटवर जाऊ शकत नाही. जर कधी असा दिवस आला की तुम्हाला काम मिळत नाही, तर तुम्हाला कामासाठी काम करावे लागेल. तुम्ही नक्कीच एक माणूस आहात, तुम्हाला काम करावे लागेल आणि तुमच्या कुटुंबाचे पालनपोषण करावे लागेल, परंतु त्याच वेळी तुम्हाला निवडक आणि चिकटून राहावे लागेल.
शाहिद कपूरने कोणाचेही नाव घेतले नसले तरी, तो खिलाडी अक्षय कुमारचा उल्लेख करत होता, याचा अंदाज लावला जाऊ शकतो, कारण तो एका वर्षात अनेक चित्रपट आणि प्रोजेक्टवर काम करतो. अलीकडेच तो 'मिशन रानीगंज' या चित्रपटात दिसला आहे, ज्यामध्ये अक्षयने त्याच्या व्यक्तिरेखेसाठी बनावट मिशा लावल्या आहेत. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)