Close

DDLJ मध्ये काजोलला खांद्यावर घेऊन शाहरुखला झालेला फ्रोझन शोल्डर, खूप वर्षांनी अभिनेत्रीने केला खुलासा (When SRK had a frozen shoulder after lifting her for DDLJ poster, Kajol Share interesting story)

शाहरुख खान-काजोलची जोडी आजही बॉलिवूडची सर्वात रोमँटिक आणि आयकॉनिक जोडी म्हणून ओळखली जाते, त्यांचा चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये तितकाच आवडीचा आहे.  चित्रपटातील प्रत्येक दृश्याच्या, प्रत्येक संवादाच्या, प्रत्येक पात्राच्या प्रेमात लोक पडले. चित्रपट लोकांसाठी भावनिक बनला होता. इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाचे पोस्टर लोकांच्या मनात आहे. पण हे पोस्टर शूट करताना शाहरुख खानला फ्रोझन शोल्डर आला हे तुम्हाला माहीत आहे का. नाही, नाही का? हा मजेदार खुलासा आता खुद्द काजोलनेच केला आहे.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान काजोलने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाशी संबंधित एक मजेदार किस्सा शेअर केला. ही कथा चित्रपटाच्या पोस्टर शूटशी संबंधित आहे, त्यावेळी काजोलला खांद्यावर कसे उचलायचे याची शाहरुखला चिंता होत होती. तो तेव्हा काहीच चिंता नसल्यासारखे दाखवत होता. मात्र तरीही त्याला टेंशन खूप आलेले.

पोस्टर शूटची कथा शेअर करताना काजोल म्हणाली, शाहरुखला मला खांद्यावर उचलावे लागले. मी त्याला म्हणाले, तू हे करशील का, तुला खात्री आहे का? मला त्याची खूप काळजी वाटत होती. तो मला खांद्यावर कसे उचलणार? पण शाहरुख म्हणाला, मी ते करेन, मी खंबीर आहे. मी म्हणाले, 'हो, पण तुला मला खांद्यावर घेऊन जावे लागेल. तु हे करु शकतोस का?'

मला वाटते की त्याने माझा मुद्दा आपल्या मर्दांगिवर घेतला. तो मला म्हणू लागला की तू असं कसं बोलू शकतोस. मी एक पुरुष आहे आणि आपली मर्दानगी दाखवण्यासाठी त्याने मला खांद्यावर उचलले आणि रोमँटिक पोजमध्ये हसत हसत हे शूट केले. शाहरुखने मला प्रेमाने त्याच्या खांद्यावर बसवले आणि मला अजिबात अस्वस्थ वाटू दिले नाही. पण शूटनंतर त्याला फ्रोझन शोल्डर झाला

शाहरुख आणि काजोलने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट एकत्र दिले आहेत. बाजीगर आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' व्यतिरिक्त या जोडीने 'करण अर्जुन', 'कभी खुशी कभी गम' सारखे अनेक उत्तम चित्रपट केले आणि प्रत्येक वेळी चाहत्यांची मने जिंकण्यात यश मिळवले.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/