
आपल्या वास्तूमध्ये योग्य दिशेला प्रस्थापित केलेले देवघर आपणांस सकारात्मक परिणाम देते. तसेच आपल्या सर्व मनोकामनाही पूर्ण करते.
वास्तुशास्त्रात देवघराला सुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. ज्या देवघरात आपण आपल्या इष्ट देवतांची प्राणप्रतिष्ठापना करून दररोज अगदी भक्तीभावाने त्यांची पूजाअर्चा करतो, ते देवघर आपल्या वास्तूच्या योग्य दिशेला प्रस्थापित केलेले असणे खूप गरजेचे आहे. कारण त्यामुळेच तुम्ही केलेली पूजा मान्य होऊन देवांचे शुभाशिर्वाद तुम्हाला लाभतात व सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. त्यासाठी देवघरासंबंधीत काही नियमावली पाहूया.
देवघर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे.
देवघर शयनगृहात असू नये.
देवघर दक्षिणेकडे असू नये.
देवघरासमोर बाथरुमचा दरवाजा असू नये.
देवघरासमोर टॉयलेटचा दरवाजा असू नये.
देवघराच्या वर किंवा खाली टॉयलेट-बाथरुम असू नये.
देवघर त्रिकोणी असू नये.
देवघरास कळस असू नये.
देवघरास ध्वज, विजयस्तंभ असू नये.
देवघरास भुयार असू नये.
देवघरास गोल-घुमट असू नये.
देवघरात पैसे लपवून ठेवू नयेत.
देवघराला ग्रीलचा (संपूर्ण जाळीचा) दरवाजा असू नये.
देवघर भिंतीत कोरून तयार करू नये.
देवघरात आग्नेय दिशेला समई-निरांजन असावे.
देवघरात अभिषेक पात्र ईशान्य किंवा पूर्व कोपर्यात असावे.
देवघरात होमकुंड, अग्निकुंड आग्नेय कोपर्यात असावे.
देवघरात भंगलेल्या मूर्ती असू नयेत.
देवघरात अवजड वस्तू ठेवू नयेत.
देवघरात देवाच्या मूर्तीचे तोंड दक्षिणेस, उत्तरेस असू नये.
देवघरात देवाच्या मूर्तीसमोर तिजोरी असू नये.
देवघरात दिवंगत व्यक्तींच्या तसबीरी (फोटो) असू नयेत.
देवघरात खूप मूर्तींची गर्दी असू नये.
देवघरात कुलदेवतेची मूर्ती किंवा तसबीर नक्की असावी.
देवघरात एका देवाची एकच तसबीर किंवा एकच मूर्ती असावी.
देवघर कायम स्वच्छ असावे.
देवघरात जळमटे असू नयेत.
देवघरात रोज सकाळ-संध्याकाळ दिवा लावावा.
देवघरात चोवीस तास तेलाचा दिवा तेवत असल्यास त्याची कायम शुभच फळे मिळतात.
देवघरात महाभारतातील तसबीरी असू नयेत.
देवघरातील निर्माल्य रोजच्या रोज बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावावी.
देवघरास आपोआप उघड-मीट करणारा दरवाजा असू नये.
देवघरास मोडके दार असू नये.
देवघराच्या छतास चारही बाजूने उतार असावा.
देवघरास पूर्व किंवा उत्तर दिशेस दरवाजा असावा.
देवघरास भडक रंग असू नये.
देवघरास फिकट पांढरा, फिकट निळा किंवा फिकट पिवळा रंग असावा.
देवघरातील देव समोरासमोर ठेवू नयेत.
देवघरात घंटा जरूर असावी.
देवघरात शंकराच्या पिंडीचे तोंड उत्तरेस असावे.
देवघरात अन्नपूर्णेची छोटीशी मूर्ती जरुर असावी. याने घरात अन्नधान्याची भरभराट असते.