बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने तिचा दिर्घकालीन प्रियकर नुपूर शिखरेसोबत ३ जानेवारीला रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्या दिवशी, नुपूर बनियन आणि शॉर्टस् घालून धावत पळत लग्नाच्या ठिकाणी पोहचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचा तो लूक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
नुपूर शिखरे ३ जानेवारीला ८ किलोमीटरचा धावून आयराशी लग्न करायला गेला. विवाहस्थळी पोहचताच त्याने अगदी उत्साहात डान्सही केला. आता नूपुरने धावत जाण्यामागचे कारण सांगितले आहे.
आयरासोबत रजिस्टर लग्न करण्यासाठी सांताक्रूझ येथून पळत नुपूर वांद्रे येथील गेल. तो आपल्या काही मित्रांसोबत ८ किलोमीटर पळत तिथे गेलेला.
वेडिंग प्लॅनरने आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नूपुरने सांगितले की, तो त्याच्या घरातून आयराच्या घराकडे पूर्वी धावतच जायचा. तिथे जाणारा रस्ता त्याचा खूप जिव्हाळ्याचा आहे.
यानंतर, ८ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूरचे ख्रिश्चन पद्धतीत पुन्हा एकदा लग्न केले, या लग्नात कुटुंब आणि मित्रांसह सुमारे २५० पाहुणे उपस्थित होते.