Close

थंडीत संत्री का खावीत? (Why Oranges Are Favourite In Winter)

थंडीत संत्री का खावीत?

हिवाळा सुरु झाला की बाजारात सगळीकडे संत्री दिसू लागतात. हल्ली बारमाही मिळणारी संत्री देखील असतात. पण तरीदेखील नागपुरात मिळणार्‍या संत्र्यांची चव ही त्या संत्र्यांच्या तुलनेत थोडी वेगळीच असते. संत्री हे आंबट वर्गीय एक फळ असून यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे केस आणि त्वचेसाठी फारच फायद्याचे असते. थंडीत संत्री आवर्जून खायला हवीत. यामागेही काही कारणे आहेत ती जाणून घेऊया.

किडनी स्टोन प्रतिबंधक
जी लोकं पाण्याचे सेवन फारच कमी प्रमाणात करतात. अशांना किडनी स्टोन होण्याचा खूपच त्रास होतो. थंडीच्या दिवसात पाण्याचे सेवन आपण फारच कमी करतो. त्यामुळे स्टोन होण्याची शक्यता असते. संत्र्याचे सेवन केल्यामुळे त्यामध्ये असलेले पोटॅशिअम सायट्रेसचे गूण असतात जे आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. तसेच किडनी स्टोनचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. अशक्तपणा होईल दूर कोव्हिडच्या काळात लिंबूवर्गातील फळं जास्तीत जास्त खाण्याचा सल्ला दिला जात होता. संत्र यामध्ये मोडते. संत्रीमधील व्हिटॅमिन्स आणि सायट्रिक सिडमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. दीर्घ आजारपण आले असेल किंवा तोंडाची चव निघून गेली असेल तर अशावेळी संत्री खावीत. संत्री खाल्ल्यानंतर अशक्तपणा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

त्वचा ठेवते मॉयश्चराईज
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे त्वचा मॉयश्चराईज ठेवण्यास मदत मिळते. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते. त्यामधील ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले असते. चेहर्‍यावर मॉयश्चरायजर टिकवून ठेवायचे असेल तर तुम्ही हमखास संत्री खायला हवी. चांगल्या त्वचेसाठी तुम्ही बारा महिनेही संत्री खाल्ली तरी चालू शकतील. याशिवाय संत्र्यामध्ये न्टीऑक्सिडंट घटक असतात. जे त्वचेसाठी फारच फायद्याचे असतात.

ह्रदयविकाराचा धोका कमी करते
अलिकडे हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलंय. ज्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते अशांना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी ह्रदय निरोगी हवे असेल तर तुम्ही संत्री ही खायलाच हवी. संत्र्यामध्ये फ्लेव्हनॉईड्स नावाचा घटक असतो. ज्यामुळे तुमचे ह्रदय चांगले राहते.

Share this article