मुकेश अंबानी! हे नाव घेताच आपण जगातील फक्त आणि फक्त आलिशान गोष्टींचा विचार करू लागतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या परिवाराशी संबंधित प्रत्येक गोष्टीत एक राजेशाही थाट पाहायला मिळतो. अगदी अंबानींचा मुंबईमधील आशियाना, सुन श्लोका मेहता- अंबानीच्या गळ्यातील महागडा डायमंड नेकलेस, लेक ईशा अंबानींचा शाही विवाह सोहळा ते नीता अंबानी यांचं साडी कलेक्शन प्रत्येक गोष्टीची खास अशी खासियत असतेच.
अलीकडेच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे जेव्हा उद्घाटन झाले तेव्हा त्या सोहळ्यातही प्रत्येक गोष्ट ही डोळे दिपवून टाकणारी होती. टॉम हॉलंड, प्रियांका चोप्रा- निक जोनास, जीजी हदीद या सेलिब्रिटीजच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा अनेक आठवडे चर्चेत होता आणि अजूनही त्याचे क्रेज कमी झालेले नाही. मात्र यावेळेस या कल्चरल सेंटरमधील एक लिफ्ट चर्चेत आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबानींच्या कल्चरल सेंटरमध्ये उभारण्यात आलेली लिफ्ट ही जगातील सर्वात मोठी लिफ्ट आहे. अवघ्या पाच माळ्यांच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या या लिफ्टमध्ये सोफ्यापासून ते लाईट्सपर्यंतची सगळी सोय आहे. काही इन्फ्ल्यूएंसर्सनी या लिफ्टची सफर घडवताना याची तुलना मुंबईतील महागड्या २ बीएचके घरांशी सुद्धा केली होती. साधारणपणे २०० लोकांना एकाचवेळी प्रवास करता येईल अशी सोय या लिफ्टमध्ये आहे.
आजवर अनेक इन्फ्ल्यूएंसर्सनी याबाबत व्हिडीओ पोस्ट केले होते, त्यातील सौरभ बेदी याचा व्हिडीओ खूप चर्चेत होता. या व्हिडिओला तब्बल १० लाख व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्स आहेत. चला मग, या भल्यामोठ्या लिफ्टचं आपणही आता प्रत्यक्ष दर्शन घेऊया..