'12वी फेल' अभिनेता विक्रांत मॅसीचा आनंद सध्या शिगेला पोहोचला आहे. त्याच्या '12वी फेल' या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही जिंकले असून सर्वसामान्यांपासून खास लोकांपर्यंत सगळेच चित्रपटाचे कौतुक करताना थकत नाहीत. या यशाने विक्रांत मॅसी आधीच खूश असून आता आणखी एक आनंदाची बातमी त्याला मिळाली आहे. ती म्हणजे तो बाबा झाला आहे. त्याची पत्नी शीतल ठाकूर हिने काल मुलाला जन्म दिला आहे, अभिनेत्याने हा आनंद सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केला आहे.
विक्रांत मॅसीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. कालची तारीख या पोस्टमध्ये लिहिली आहे, म्हणजेच या जोडप्याने कालच बाळाचे स्वागत केले आहे. त्यांना एक गोड मुलगा झाल्याचा खुलासाही त्यांनी केला.
विक्रांतने एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे - "07.02.2024. आम्ही तिघेही एक झालो आहोत. आम्हाला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की आमचे प्रेम या जगात आले आहे. शीतल आणि विक्रांत." ही पोस्ट शेअर करताना विक्रांतने हात जोडलेला इमोजी शेअर केला आहे.
विक्रांतच्या या पोस्टनंतर आता सगळेच त्याचे अभिनंदन करत आहेत. या कपलचे आई-वडील झाल्याबद्दल चाहते आणि सेलिब्रिटी आनंद व्यक्त करत आहेत. त्याचवेळी, काही चाहते बाळाचा चेहरा लवकरच दाखवण्याची विनंती करत आहेत.
विक्रांत मॅसीचे शीतल ठाकूरसोबत २०२२ मध्ये पहाडी रितीरिवाजानुसार लग्न झाले होते. विक्रांतने त्याचे लग्न अगदी खासगी ठेवले होते. मात्र, लग्नाच्या फंक्शनपासून ते लग्नापर्यंतचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फेब्रुवारीमध्ये या जोडप्याला लग्नाला 2 वर्षे पूर्ण होतील आणि आता दोन वर्षानंतर विक्रांत आणि शीतलने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे.