Close

कामशक्ती वाढविण्याचे 5 चमत्कारी घरगुती उपाय (5 Miracle Home Remedies To Increase Workforce)

कामशक्ती वाढवून आपले कामजीवन सुखकारक आणि समाधानकारक बनवण्याकरिता चमत्कारी घरगुती उपाय.
कधी कधी प्रौढवयात आणि उतारवयात आपली कामशक्ती (सेक्स पॉवर) कमी होत असल्याची जाणीव होते. अन् आपले कामजीवन कमजोर होते. पण ही कामशक्ती वाढविता येते. खाली दिलेले काही चमत्कारी घरगुती उपाय करा आणि आपले कामजीवन सुखकारक व समाधानकारक बनवा.

कामशक्ती वाढविणारे घरगुती उपाय
 1. लैंगिक सुखामध्ये काही कमतरता दिसून येत असेल तर लसूण खाणे गुणकारी मानले जाते. तेव्हा दररोज लसणाच्या 2-3 पाकळ्या खाल्ल्या तर सेक्सची क्षमता वाढेल.
 2. कामशक्ती वाढविण्यात कांदा चांगलाच उपयोगी ठरतो. विशेषतः पांढरा कांदा. ज्या कोणाला सेक्स संबंधात कमजोरी जाणवत असेल, त्याने पांढरा कांदा नियमितपणे खायला हवा. 6 मि.ली. पांढर्‍या कांद्याचा रस घेऊन त्यात 3 ग्रॅम तूप आणि अडीच चमचे मध मिसळा. हे मिश्रण दररोज सकाळ-संध्याकाळ प्या. वरून साखर घातलेलं दूध प्या. हा प्रयोग 2-3 महिने केल्यास वीर्यवृद्धी होते आणि कामशक्ती वाढते.
 3. दिवसातून 2 वेळा नियमितपणे जांभळे खाल्ल्यास फायदा होतो.
 4. 200 मि.ली. गायीच्या दुधात 1 चमचा मध मिसळून प्यायल्यास वीर्याची वाढ होईल.
 5. 15 ग्रॅम मुसलीची मुळं 1 कप दुधात उकळून, दिवसातून 2 वेळा प्या. याच्या नियमित सेवनाने नपुंसकता व शीघ्रपतन या समस्या दूर होतील आणि सेक्स पॉवर वाढेल.

  कामशक्ती वाढविण्यासाठी अन्य काही उपचार
  कामशक्ती वाढविण्यासाठी 150 ग्रॅम बारीक कापलेल्या गाजरामध्ये एक अर्ध कच्चं अंड (हाफ बॉईल्ड एग) आणि 1 टेबलस्पून मध मिसळून, हे मिश्रण दिवसातून एक वेळा किमान 2 महिने खा.
  थंडीच्या दिवसात सकाळी 2-3 खजूर तुपात भाजून नियमित खा.
  दररोज सकाळी, ताज्या पाण्यात 1 ग्रॅम जायफळाची पावडर मिसळून घेतल्यास कामशक्ती वाढते.

  थोड्याशा मनुका पाण्याने स्वच्छ धुवा आणि दुधामध्ये उकळा, म्हणजे त्या फुगून गोड होतील. त्या खा, वरून दूध प्या.
  सकाळी नाश्त्याच्या वेळी 1 ग्लास टोमॅटो ज्यूसमध्ये थोडे मध मिसळून प्या. याच्याने शरीरातील जोम वाढतो.
  1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर 1 कप पाण्यात उकळून घ्या. झाकण ठेवून उकळा. हा रस गाळून 2-4 टेबलस्पून दिवसातून एकदा घ्या.

Share this article