Close

गदर 2च्या प्रमोशनसाठी आलेल्या दारा सिंह आणि सकिनाला कपिल शर्माने सांगितला अमरिश पुरींसोबतचा किस्सा (Kapil Sharma share story with Amarish Puri to Dara Singh and Sakina who came to promote Gadar 2)

सनी देओल सध्या त्याच्या 'गदर 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिथे तिथे तो तारा सिंगच्या गेटअपमध्ये जात आहे. नुकताच सनी देओल 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'सकीना' म्हणजेच अमिषा पटेलसोबत गेला होता. शोमध्ये कपिल शर्माने अमरीश पुरीशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगितला त्याचवेळी सनी देओलनेही अनेक जोक्स सांगितले. मेकर्सनी या एपिसोडचा प्रोमोही रिलीज केला आहे.

प्रोमोमध्ये कपिल शर्मा सनी देओलला सांगत आहे की, 'आम्ही काही दिवसांपासून पाहत आहोत की पाजी कुठेही जाता, तेव्हा तुम्ही तारा सिंहच्या गेटअपमध्ये जाता. तर अर्चना पुरण सिंहने विचारले की आज तुम्ही तुमच्या गाडीने आला आहात की ट्रक चालवत आलात?' सनी देओल म्हणजेच तारा सिंह 'गदर'मध्ये ट्रक ड्रायव्हरची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात तो सकीनाला पाकिस्तानात सोडण्यासाठी ट्रकने जात होता.

दरम्यान कपिलने अमिरीश पुरी यांच्यासंबंधी एक किस्सा सांगितला.  तो म्हणाला, 'अमिषा, जेव्हा तू अमृतसरमध्ये शूटिंग करत होतीस तेव्हा तू आणि अमरीश पुरी सरांसोबत उभी होती. तेव्हा मी अमरीश पुरीजींच्या खांद्यावर हलकेच थोपटले, ते मागे वळून म्हणाले - अरे कोण आहे?' मग मी लगेच हात जोडले. यावर जेव्हा अमिषा पटेलने कपिलला विचारले की, तू माझ्या खांद्यावर तोच टॅप केला असता तर? कपिल म्हणाला, 'नाही, इतकं करण्याची हिंमत माझ्यात नव्हती.'

अमरीश पुरी यांनी 'गदर: एक प्रेम कथा'मध्ये सकीनाच्या म्हणजेच अमीषा पटेलच्या वडिलांची अशरफ अलीची भूमिका साकारली होती. पण आता ते या जगात नाही. 2005 साली त्यांचे निधन झाले. 'गदर 2' बद्दल बोलायचे तर हा सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्याशिवाय या चित्रपटात सिमरत कौर, मनीष वाधवा आणि उत्कर्ष शर्मा यांच्या भूमिका आहेत. 'गदर 2'मध्ये मनीष वाधवा खलनायक साकारत आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/