Close

आरामदायी उन्हाळा (A Relaxing Summer)

उन्हाळा म्हणजे उन्हाच्या झळा, घाम यांनी लाही लाही होणं… एकंदर त्रासदायक… अस्वस्थता! मात्र या ऋतूमध्ये कपड्यांची योग्य निवड केल्यास उन्हाळाही आरामदायी होऊ शकतो.

उन्हाळ्यात डोक्यावर तळपणारा सूर्य आणि अंगातून वाहणार्‍या घामाच्या धारा, तनाचा आणि मनाचाही सर्व उत्साह वाहून नेतात. तयार व्हावं, घराबाहेर पडावं ही इच्छाच होत नाही. मात्र म्हणून तीन-चार महिने घराबाहेर पडायचंच नाही, असं तर करता येणार नाही ना?… मग काय करावं? तर उन्हाळ्यासाठी आपला वॉर्डरोब सुसज्ज करा. मनाला शांती देणार्‍या, उत्साह निर्माण करणार्‍या रंगांचा त्यात समावेश करा. त्यासाठी योग्य प्रकारच्या कापडाचीही निवड करा. कसं?… वाचा.
उन्हाळ्यात आरामाकडे विशेष लक्ष द्या. ज्या पोशाखांत तुम्हाला आरामदायी वाटत असेल, तेच पोशाख परिधान करा.
दररोज वापरासाठी कॉटन टी-शर्ट, शॉर्ट ड्रेस, फ्लेयर्ड ट्राउजर यांचा पर्याय परफेक्ट आहे.
उन्हाळ्यात शॉर्ट कॉटन स्कर्ट आणि प्रिंटेड हाफ पँटही वापरता येईल.
शॉर्ट कॉटन स्कर्ट आणि प्रिंटेड हाफ पँटही उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे.
सौम्य कलाकुसर असलेली ए-लाइन ट्युनिक आणि सुती कुर्ता ड्रेस परिधान करा.
कुर्ता-पायजमा तर उन्हाळ्यासाठी ऑल टाइम हिट आहे. पायजम्यात आरामदायी तर वाटतंच, मात्र ते अतिशय स्टायलिशही असतात.

लेयर असलेले ड्रेस हिवाळ्याच्या ऋतूसाठीच असतात, असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. उन्हाळ्यातील तीव्र उन्हापासून बचाव करण्यासाठीही या लेयर्ड ड्रेसचा पर्याय उत्तम ठरतो.
लेयरिंगसाठी वेगळ्या प्रकारच्या कापड आणि स्टाइलच्या कोट्स आणि जॅकेट्सचा वापर करा.
उन्हाळ्यात पांढरा रंगाला पर्याय नाहीच, मात्र पांढर्‍या रंगासोबत बेज किंवा न्यूट्रल रंगांचाही वापर करा.
यंदा उन्हाळ्यात सिंगल कलरचाही ट्रेंड असेल. म्हणजे कपाळापासून पायापर्यंत, डोक्यावरील स्कार्फ किंवा टोपीपासून पादत्राणांपर्यंत एकाच रंगाचा वापर करायचा.
उन्हाळ्यात लेसही ट्रेंडमध्ये असते. पारंपरिक पोशाखांसोबतच वेस्टर्न ड्रेसमध्येही या लेसचा कल्पक वापर करा.
धाग्यांची कलाकुसर यंदाही ट्रेंडमध्ये असेल. पॅचवर्क, क्रोशिया इत्यादी जरूर अजमावून पाहा.
पार्टी वेअरसाठी, फेदरपासून फ्रिंजेसपर्यंतचा पर्याय वापरता येईल. क्रिस्टल फ्रिंज, फेदर ट्रिमिंग तुम्हाला पार्टीमध्ये वेगळा लूक देतील.
बांधणी, बाटिकची फॅशनही ऑल टाइम हिट आहे. बांधणी, बाटिक प्रिंटच्या सलवार-कुर्त्यासोबतच, मॅक्सी किंवा शॉर्ट ड्रेस, टॉप, जंपसूट इत्यादीही वापरता येईल.
समर कलेक्शनमध्ये प्लीट्सचाही खूप वापर केला जातो. मात्र प्लीट्स लहान-लहान आणि थोड्या घट्ट असायला हव्यात.
खादीच्या कापडापासून तयार केलेल्या फॅशनेबल कपड्यांची सध्या धूम आहे. अगदी साडी-कुर्तापासून मिनी ड्रेसपर्यंत विविध रूपात तुम्ही खादी परिधान करू शकाल. स्टाईल आणि कम्फर्टचं परफेक्ट कॉम्बिनेशन याद्वारे तयार करता येईल.
या उन्हाळ्यात मखमली कापडाचा वापरही स्टायलिश आणि आरामदायी असेल.
उन्हाळ्यात आकाश निरभ्र आकाशी रंगाचं असतं, म्हणूनच बहुधा हा आकाशी रंग उन्हाळ्यात सर्वाधिक पसंत केला जातो. तुम्हीही आपल्या पेहरावात आकाशी, इंडिगो रंगाचा वापर जरूर करा.
ग्रे-व्हाईट मॅटालिक सिल्व्हर, बेज-ब्राउन-खाकी किंवा ब्लॅक-व्हाईट ग्रे, अशा सॉफिस्टिकेटेड रंगांचं कॉम्बिनेशन यंदा नक्की पेहरावात अजमावून पाहा.
न्यूट्रल पेस्टल आणि पेल पिंक, आयव्हरी, सिल्व्हर, ग्रे असे सॉफिस्टिकेटेड पेस्टल रंग या उन्हाळ्यासाठी परफेक्ट शेड्स आहेत.

कोणते रंग वापराल?
लाल, नारिंगी आणि पिवळा असे ब्राइट रंग उन्हाळ्यासाठी हॉट पर्याय आहेत.
उन्हाळ्यात न्यूट्रल रंगही ट्रेंडमध्ये असतील.
लाइम ग्रीन आणि मिलिट्री ग्रीन यांचं कॉम्बिनेशनही कुल दिसेल. हे दोन्ही रंग वेगवेगळेही परिधान करता येतील.
सूदिंग लूकसाठी टोमॅटो रेड रंगाचा वापर जरूर करा.
टर्मरिक यलो, गोल्डन यलो, पिच आणि पांढरा हे रंग तर उन्हाळ्यात नेहमीच पसंत केले जातात.
कोरल शेड्समध्ये ब्राइट टू लाइटचं कॉम्बिनेशन ट्रेंडमध्ये आहे.
गुलाबीच्या सर्व रंगछटा, कमळ आणि गुलाबाचे रंग उन्हाळ्यात आल्हाददायक वाटतात.
डोळ्यांना आणि मनाला थंडावा देणारा निळा आणि ऑलिव्ह ग्रीन हे रंगही जरूर अमजावून पाहा.

परफेक्ट कलर कॉम्बिनेशन
पिवळ्या रंगासोबत हिरव्या किंवा पांढर्‍या रंगाचं कॉम्बिनेशन अजमावून पाहा. उन्हाळ्यात हिरव्या रंगासोबत पांढराही शोभून दिसतो.
पिवळा आणि नारिंगीही उन्हाळ्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.
काही नवीन अजमावून पाहायचं असेल, तर पेल ब्ल्यूसोबत बेबी पिंक रंगाचं कॉम्बिनेशन ट्राय करा.
राखाडीसोबत गुलाबी म्हणजे उन्हाळ्यासाठी उत्तम रंगसंगती आहे.
लाल-निळा आणि नारिंगी-निळा ही रंगसंगतीही या उन्हाळ्यात ट्रेंड करणार आहे.
न्यूटल रंगांना गडद रंगांसोबत वापरा. बेज किंवा टॅन रंगासोबत मरूण रंग नक्कीच शोभून दिसेल.
क्लासी लूकसाठी पांढर्‍या रंगासोबत काळ्या रंगाचे पट्टे, अर्थात स्ट्राइप्स असलेला ड्रेस शोभून दिसेल.
सूर्यफुलाचं कॉम्बिनेशन, अर्थात काळा आणि सनशाइन पिवळा हे कॉम्बिनेशन उन्हाळ्यात सुंदर दिसतं.

अ‍ॅक्सेसरीज
उन्हाळ्यात कमीत कमी अ‍ॅक्सेसरीज घाला.
हलक्या वजनाची पट्ट्या पट्ट्यांची डिझाइन असलेली स्लिपर्स किंवा शूजचा पर्याय उत्तम आहे.
उन्हाळ्यात आपल्या अ‍ॅक्सेसरीजच्या कलेक्शनमध्ये सनग्लासेसचा समावेश जरूर करा. ते डोळ्यांचं उन्हापासून संरक्षण तर करतीलच, सोबत स्टायलिश लूकही देतील.
फुलाफुलांची डिझाइन असलेल्या रंगीत बॅग्ज उन्हाळ्यात वापरा. त्या तुमच्या पेहरावाला आणखी ट्रेंडी करतील.
उन्हाळ्यात लहानपेक्षा मोठ्या बॅग अधिक शोभून दिसतात.

Share this article