बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्याने आमिर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आता आमिर खानने मुंबईत नवा आलिशान फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आली आहे. त्याच्या या प्लॅटची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
नुकतच आमिर खानने पुन्हा एकदा पाली हिल परिसरातील आकर्षक इमारतीत लॅविश अपार्टमेंट खरेदी केले आहे. या घराची किंमत जवळपास ९.७५ कोटी रुपये आहे. त्याचे हे घर १०२७ क्वेअर फीट असल्याचं बोललं जात आहे. आमिरने २५ जून रोजी हे घर खरेदी केले आहे. या घरासाठी आमिरने ३० हजार रुपये रजिसिट्रेशन फी दिली असून ५८.५ लाख रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे.
पाली हिल हा परिसर मुंबईतील सगळ्यात प्रतिष्ठित आणि मागणी असलेलं ठिकाण आहे. आमिर हा सध्या पाली हिल्स परिसरातच राहतो. याच भागात बेला विस्ता नावाची नवी बिल्डींग आहे. या बिल्डींगच्या अप स्केलमध्ये आमिरने हा नवा प्लॅट खरेदी केला आहे. आमिरचा फ्लॅट त्याच्या जुन्या घरापासून किती लांब आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आमिर खानने पाल हिल्स परिसरातील बेला विस्ता अपार्टमेंट्स आणि मरिना अपार्टमेंट्समध्ये आधीच काही प्लॅट घेऊन ठेवले आहेत. याशिवाय वांद्रे येथे समुद्रकिनारी आमिरचे आलिशान घर आहे. हे घर ५ हजार क्वेअर फूट आहे. या घराचे दोन मजले आहे. घराला एक ओपन एरिया आहे जेथे पार्टी आणि इवेंट्स होतात. २०१३मध्ये आमिरने पाचगणी येथे ७ कोटी रुपयांचा फार्महाऊस खरेदी केला होता. हा फार्महाऊस दोन एकरमध्ये वसलेला आहे.
याशिवाय आमिर खानची कमर्शियल प्रॉपर्टी देखील आहे. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे आमिर खानने २२ घरे घेतली आहे. तसेच इतरही काही भागात आमिरची संपत्ती आहे. आमिरच्या एकूण संपत्तीचा आकडा हा १८६२ कोटी रुपये आहे.