अब्दू रोझिक जानेवारी २०२४ मध्ये त्याची होणारी बायको अमीरा हिला दुबईत भेटला त्यानंतर त्यांची मैत्री झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी २४ एप्रिल २०२४ रोजी शारजाह येथे साखरपुडा केला. सध्या ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र काहींनी या साखरपुड्यावर शंका घेतली असून हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. मात्र आता अशा सर्व बातम्या फेटाळून लावत, 'ETimes' ला दिलेल्या मुलाखतीत अब्दूने तो कोणत्याही म्युझिक व्हिडिओची किंवा त्याच्या कामाची जाहिरात करत नाहीये असा खुलासा केला. त्याच्यासारख्या ठेंगण्या माणसाला प्रेम मिळाले आहे यावर विश्वास ठेवणे लोकांना कठीण जात असेल असेही तो बोलला.
अब्दूने तरुण वयात लग्न करण्याच्या आपल्या निर्णयाबद्दलही सांगितले. २२ वर्षीय अब्दूने शेअर केले की, अमीराला एका फूड जॉइंटमध्ये भेटल्यानंतर तो लगेच तिच्या प्रेमात पडला. आपली गर्लफ्रेंड किती समजूतदार आहे याबद्दलही त्याने सांगितले, 'मी नशीबवान आहे की मला शेवटी माझे प्रेम मिळाले. मी अमीराला एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो आणि मला ती लगेचच आवडली. ती सुंदर आहे, तिचे लांब केस आणि सुंदर डोळे आहेत. आम्ही एकमेकांना चार महिन्यांपासून ओळखतो. ती बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची विद्यार्थिनी आहे. ती खूप हुशार आहे आणि आमच्यात खूप चांगलं नात आहे, म्हणून मी ते पुढच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला.
अब्दूने सांगितले की त्याच्या आणि त्याच्या होणाऱ्या बायकोमधील उंचीचा फरक त्यांच्या नात्यात कधीही समस्या निर्माण करत नाही. उंचीच्या फरकाबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, अमिरापेक्षा उंचीने लहान असूनही त्यांच्या नात्यात हा मुद्दा येत नाही. ४ फुटांपेक्षा कमी उंची असलेल्या अब्दूने सांगितले की, आधी त्याला वाटायचे की त्याला त्याच्यासाठी जोडीदार शोधणे कठीण जाईल.
अब्दू म्हणाला, 'मी ११५ सेमी उंच आहे तर ती १५५ सेमी (५फूट) उंच आहे. या जगात असे अनेक लोक आहेत जे अपंग आहेत आणि त्यांना त्यांचा जोडीदार सापडतो. मी लहान असताना मला वाटायचे की माझ्यासाठीं जोडीदार मिळणे कठीण जाईल. पण देवाच्या कृपेने मला माझ्यापेक्षा उंच असं कोणीतरी मिळालं आहे, पण उंचीचा फरक आमच्या नात्यात कधीच आला नाही. आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि एकमेकांचा खूप आदर करतो.