‘गोध्रा’ सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. या टिझरमध्ये साबरमती एक्सप्रेस हल्ल्यावर परखडपणे भाष्य करण्यात आलंय.
२७ फेब्रुवारी २००२ ची साबरमती एक्सप्रेस गोध्रा जंक्शनजवळ अडवण्यात आली. पुढे हल्लेखोरांनी एक्सप्रेसचे डबे जाळले. अनेक माणसं या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडली. गुजरातमधील हे हत्याकांड घडून २१ वर्षे झाली तरीही अजून गुजरातमधील जनतेच्या मनात या वेदनेची सल कायम आहे. याच भीषण घटनेवर आधारीत ‘Accident Or Conspiracy Godhra’ सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एम. के. शिवाक्ष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
२००२ मध्ये घडलेली ही दुःखद घटना आणि पीडितांची खरी गोष्ट रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. हा सिनेमा १२ जुलै २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात अभिनेता रणवीर शौरी एका वकिलाचा भूमिकेत दिसणार आहे. रणवीर गोध्रा रेल्वे जळीतकांड प्रकरणातील पीडितांची बाजू न्यायालयासमोर मांडताना दिसेल. हा चित्रपट २००२ च्या गोध्रा हत्याकांड प्रकरणातील सत्य घटनांवर बेतलेला आहे. साबरमती एक्स्प्रेस, कोच एस ६, ५९ हे अंक यात अत्यंत ठळकपणे दाखवण्यात आले आहेत. साबरमती एक्सप्रेसच्या एस६ कोचला आग लावण्यात आली होती आणि मीडिया रिपोर्टनुसार यात ५९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत २,००० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता.
गोध्रा रेल्वे जळीतकाडांशी संबंधित घटनांवर अनेक चित्रपट यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत. ‘काय पो छे’, ‘परजानिया’, ‘फिराक’सारखे चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरले होते. परंतु, या नवीन चित्रपटाने ज्या पद्धतीने हा विषय हाताळला आहे ते पाहता नक्कीच याची चर्चा होईल, असं चित्र सध्या तरी दिसत आहे.