Close

अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे शोककळा (Actor Firoz Khan Known For Imitating Amitabh Bachchan Dies Of Heart Attack)

'भाभीजी घर पर है' फेम अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसणारे अभिनेते फिरोज खान यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. फिरोज खान हे केवळ त्यांच्या कामासाठीच ओळखले जात नव्हते, तर बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसत असल्याने त्यांना बिग बींचे डुप्लिकेट देखील म्हटले जात होते.

अमिताभ बच्चन यांच्या मिमिक्री आणि अभिनयामुळे फिरोजने लोकांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले होते. चाहत्यांना त्यांची स्टाईल खूप आवडायची. आता त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्याचे चाहतेच नाही तर'भाभीजी घर पर हैं!' शोची टीम आणि प्रेक्षकही त्यांच्या निधनाने दु:खी झाले आहेत. सोशल मीडियावर सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. फिरोज खान यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

कॉमेडी शो'भाबीजी घर पर हैं!' ही मालिकाच नाही तर, त्यांनी चित्रपटांमध्येही आपली प्रतिभा दाखवली आहे. 'भाबीजी घर पर हैं!' या कॉमेडी शोमध्ये फिरोजचा नेहमीच सहभाग होता. या मालिकेद्वारे त्यांना ओळख मिळाली होती. या शो शिवाय 'जिजाजी छत पर हैं', 'साहेब बीबी और बॉस', 'हप्पू की उलटन पलटन' आणि 'शक्तिमान' सारख्या शोसाठीही फिरोज ओळखले जातात. इतकंच नाही, तर गायक अदनान सामीच्या सुपरहिट गाण्यातील' थोडी सी तू लिफ्ट करा दे'सह अनेक चित्रपटांमधील कामासाठी फिरोजचे कौतुकही झाले आहे.

Share this article