Close

६ वर्षानंतर अभिनेता ऋषी सक्सेनाचे मराठी मालिकेत पुनरागमन : ‘आई कुठे काय करते’ मध्ये शेफच्या भूमिकेत (Actor Hrishi Saxena Makes A Comeback In Marathi Serial After A Gap Of 6 Years)

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे. ऋषीला याआधी आपण अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमातून भेटलोय. तब्बल ६ वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.

आई कुठे काय करते मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना ऋषी म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत काम करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण होतेय. आई कुठे काय करते ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे.  आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे.

खरंतर खूप दिवसांपासून मराठी मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा होत होती. मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. आई कुठे काय करते मालिकेतल्या मिहीर या व्यक्तिरेखेसाठी मला विचारण्यात आलं आणि मला ही व्यक्तिरेखा खूपच भावली. जवळपास ६ वर्षांनंतर मी मराठी मालिकेत काम करतोय. शूटिंगच्या पहिल्या दिवशी थोडं टेन्शन होतं. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला आपलसं करुन घेतलं. आजवर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरुन प्रेम दिलं आहे. हेच प्रेम या नव्या भूमिकेलाही देतील याची खात्री आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/