अभिनेत्री बिपाशा बासू व अभिनेता करण सिंग ग्रोव्हर कित्येक दिवसांनी पुन्हा प्रसिद्धीस पावले. निमित्त होतं एका रॅम्प वॉकचं. जो त्यांनी तरुण मुलांसह घेतला. ज्युनियर किलर या नवीन हाय स्ट्रीट फॅशन ब्रॅण्डचे अनावरण मुंबईत झाले. त्यावेळी झालेल्या फॅशन शो मध्ये बच्चे कंपनीने मोठ्या उत्साहात रॅम्प वॉक घेतला. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बिपाशा व करण यांनी साथसंगत केली.
डेनिम वस्त्रोद्योगात अग्रगण्य असलेल्या केवल किरण क्लोदिंग कंपनीने तरुण मुलांमध्ये वाढत असलेल्या फॅशन जागरुकतेची दखल घेत, ४ ते १६ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी ज्युनियर किलर या वर्गवारीत विविध कलेक्शन्स सादर केली आहेत. फॅशन बाबतीत मोठ्यांचे अनुकरण करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती पाहता, त्यांच्या सोयीसाठी कॅज्युअल्स, टी शर्टस्, शर्टस् व डेनिम्स इत्यादी श्रेणीतील हे कपडे आहेत. सदर कपड्यांचे व ते घालून फॅशन शो मध्ये भाग घेतलेल्या तरुण मुलांचे बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर यांनी कौतुक केले.