Close

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अपूर्वा नेमळेकर ग्लॅमरस भूमिकेत (Actress Apurva Nemlekar Takes A Glamorous Look In Marathi Series “Premachi Gosht”)

४ सप्टेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून नव्या पात्रांना भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एका लक्षवेधी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सावनी असं तिच्या भूमिकेचं नाव असून अतिशय ग्लॅमरस असं हे पात्र आहे.

सावनी या पात्राविषयी सांगताना अपूर्वा नेमळेकर म्हणाली, ‘स्टार प्रवाहसोबत जवळपास ८ वर्षांनी पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. या मालिकेत मी खलनायिका साकारते आहे. खलनायिका जरी साकारत असले तरी या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. सावनी हे पात्र उभं करताना अभिनेत्री म्हणून माझा कस लागतोय. या भूमिकेसाठी मी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करतेय. माझ्या लूकवर खूप मेहनत घेतली जातेय. मी या भूमिकेसाठी बरचसं वजनही कमी केलंय. सावनी अतिशय ग्लॅमरस आहे. त्यामुळे साड्यांपासून ते अगदी तिच्या दागिन्यांपर्यंत सगळं खूपच खास असणार आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी अशी ही भूमिका आहे. प्रेक्षकांनी मला माझ्या प्रत्येक कामात मोलाची साथ दिली आहे. हीच साथ आणि प्रेम माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/