टीव्ही अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी हिच्याबद्दल अत्यंत मोठी बातमी येताना दिसत आहे. टीव्ही अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. विशेष म्हणजे टीव्ही मालिकांमुळे तिने बराच मोठा चाहतावर्ग मिळवला आहे. नुकताच प्रियंका चाहर चौधरीचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
टीव्ही अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियंका बिग बॉसमध्ये देखील सहभागी झाली होती. विशेष म्हणजे धमाकेदार गेम खेळताना प्रियंका दिसली होती. प्रियंका चहर चौधरी हिला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरात तिचा बॉयफ्रेंड अंकित हा देखील पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका कामाच्या शोधात दिसत होती. हेच नाही तर तिला मुंबईमध्ये घर देखील मिळत नव्हते. आता प्रियंकाचं नशीब चांगलंच उजळल्याचं बघायला मिळतंय. प्रियंकाचे काही खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
व्हायरल होणारे हे फोटो दुसरे तिसरे कशाचे नसून चक्क प्रियंका हिच्या लग्नाचे आहेत. प्रियंका चक्क कपूर खानदानाची सून झालीये. अभिनेत्रीचे हे व्हायरल होणारे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडले असल्याचे बघायला मिळतंय. लोक प्रियंका चहर चौधरी हिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
फोटोमध्ये प्रियंकाचे लग्न तूषार कपूर याच्यासोबत होताना दिसत आहेत. दोघांचे व्हायरल होणारे हे फोटो लग्नातील आहेत आणि दोघे एकमेकांच्या शेजारी बसले असून लग्नाच्या विधी होताना दिसत आहेत. नवरीच्या लूकमध्ये प्रियंकाचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. तूषार कपूर आणि प्रियंका चहर चौधरी यांचा जोडा लोकांना आवडलाय.
प्रियंका चहर चौधरी हिच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोंनंतर चाहत्यांना थेट विचारले की, अंकित कुठे आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका चहर चौधरी ही अंकित याला डेट करताना दिसते. मात्र, या फोटोमध्ये चक्क अंकित याला सोडून तूषार कपूर याच्यासोबत लग्न करताना प्रियंका दिसत आहे. अनेकांनी फोटोवर कमेंट करत म्हटले की, हे फोटो खरोखरचे असावेत.
खरं सांगायचं तर प्रियंका चहर चौधरी आणि तूषार कपूर यांचे लग्न झाले नसून हे व्हायरल होणारे फोटो एका वेब सीरिजमधील शूटचे आहेत. त्या वेब सीरिजमध्ये प्रियंका आणि तूषार कपूर यांचे लग्न होताना दिसणार आहे. आता या फोटोंवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. बिग बॉसनंतर पहिल्यांदाच प्रियंका चाहर चौधरी हिला काम मिळाल्याचे बघायला मिळतंय.