Close

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत स्मिता तांबेची वकिलाच्या भूमिकेत एन्ट्री (Actress Smita Tambe Enters As A Lawyer In “Man Dhaga Dhaga Jodte Nava” Serial)

स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत सार्थक-आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही दिवसांपूर्वीच दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच आनंदीचा पहिला पती अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला अटक झाली. सार्थक निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आनंदी प्रयत्न करत असली तरी तिचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही.

सार्थकच्या विरोधात केस लढण्यासाठी निष्णात वकील नेत्रा धर्माधिकारीने कंबर कसली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे नेत्रा धर्माधिकारी हे पात्र साकारणार आहे. नेत्रा धर्माधिकारी नाशिकमधील नामवंत वकील आहे. अतिशय हुशार, तल्लख आणि चालाख असलेली नेत्रा आजवर एकही केस हरलेली नाही. नेत्रा केस लढणार म्हटल्यावर विरोधी पक्षातील वकिलांचा भीतीने थरकाप उडतो. त्यामुळे नेत्राच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य घडणार आहे.

या केसमधून सार्थक निर्दोष सुटणार का? सार्थक-आनंदीच्या आयुष्यात कोणती नवी आव्हानं येणार? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.

Share this article