द केरळ स्टोरी बस्तर अशा सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारी अभिनेत्री अदा शर्मा ही अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आताही ती एका इव्हेंटमध्ये नेसून आलेल्या साडीमुळे चर्चेत आली आहे. अदा पहिल्यांदाच साडी नेसलेली नाही, परंतु या साडीमागचं रहस्य जाणून तुम्हाला अदाच्या साधेपणाची कल्पना येईल.
अदाने नेसलेली साडी ही तिच्या आजीची असून फक्त १५ रुपयांची आहे, असे अदाने सांगितले आहे. तिच्या आजीने त्या काळात घेतलेली साडी असल्यामुळे ती इतकी स्वस्त आहे. साडीची किंमत कमी असली तरी अदासाठी ही साडी आजीची आठवण असल्यामुळे मौल्यवान असल्याचे तिने म्हटले आहे.
अदाने गेली अनेक वर्षं आजीची ही साडी जपून ठेवली आहे. यातून अदाच्या मनाचा हळवेपणा दिसून येतो. अदा या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. या साडीमागचं रहस्य समजल्यानंतर सर्वजण अदाचं कौतुक करत आहेत.
अदाच्या कामाबद्दल सांगायचं तर तिचा बस्तर हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)