Close

प्रकाश कुंटे यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘‘शक्तिमान’’ चे पोस्टर प्रदर्शित, आदिनाथ कोठारे सुपरहिरोच्या भूमिकेत ??? ( Adinath Kothare Starer Shaktiman Movie Poster Release)

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांच्या आगामी चित्रपट *“शक्तिमान“* चे पोस्टर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरने चित्रपट रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.*सुपरहिरोचा नवा अवतार, मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा प्रयोग ??**“शक्तिमान“* चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये मराठीतील आघाडीचे कलाकार आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी आणि त्याबरोबर पदार्पण करणारा बालकलाकार ईशान कुंटे यांची खास झलक पाहायला मिळते आहे.

अर्थात आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी आणि बालकलाकार ईशान कुंटे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुम्हाला चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज बांधता येतोय का? तरीही पोस्टरवरील दोन गोष्टी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत ते म्हणजे चित्रपटाचे नाव *“शक्तिमान“* आणि त्याबरोबर लिहिलेली टॅगलाईन *" बाबा तू होऊ शकतोस सुपरहिरो "*भारतात या पूर्वी *“शक्तिमान“* या नावाने एक सुपरहिट मालिका सर्वांच्या परिचयाची आहे ज्यात भारतातल्या पहिल्या सुपरहिरोची गोष्ट आहे आता त्या मालिकेचे आणि आदिनाथ च्या *“शक्तिमान“* चे काय कनेक्शन आहे किंवा काहीच नाही ? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत

. मराठी प्रेक्षक हा दक्ष असतोच त्या बरोबर उत्तम कलाकृतीचा आस्वाद घेण्यास नेहमीच तत्पर असतो त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीतील हा चित्रपट एका सुपरहिरोची संकल्पना आहे ? किंवा हा एक अतिशय वेगळा प्रयोग आहे हे जाणून घेण्यास प्रेक्षक चित्रपट प्रदर्शित होण्याची नक्कीच वाट पाहतील अर्थात पोस्टरवरील हे मनमुराद हसणारं कुटुंब आणि *"बाबा, तू होऊ शकतोस सुपरहिरो?"* या टॅगलाईनने चित्रपटाच्या कथानकाविषयी प्रेक्षकांचे कुतूहल वाढवले आहेच.

*“शक्तिमान“* चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे आपल्याला काय नवा संदेश देणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातील बालकलाकार ईशान कुंटे याचे चित्रपटातील पदार्पण असून हा दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे चित्रपट शूट होत असताना केवळ तो ६ वर्षांचा होता . *“शक्तिमान“* चित्रपटाविषयीहा नक्की कोणत्या धाटणीचा चित्रपट आहे हे अजूनही समजले नाहीय मात्र चित्रपटाचे नाव , टॅगलाईन आणि एक हसमुख कुटुंब आणि आदिनाथ ने घातलेला सुपरहिरो चा लाल रंगाचा क्रेप यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालंय हे नक्की . या चित्रपटात मुख्य भूमिकेत आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी यांच्यासह प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले असून निर्मिती मोशनस्केप एन्टरटेनमेंट ने केली आहे . मुख्य म्हणजे *झी टॉकीज* या महाराष्ट्रातील पहिल्या नंबरची चित्रपट वाहिनी हा चित्रपटाला सम्पूर्ण सहकार्य करत, चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच *झी टॉकीज* वाहिनीने *“शक्तिमान“* चित्रपटाचे *Satelite rights* विकत घेतले आहेत , ही गोष्ट सुद्धा *“शक्तिमान“* या चित्रपटाविषयी वेगळी ठरते .

*२४ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार चित्रपट*या पोस्टरद्वारे संपूर्ण चित्रपट टीम ने *“शक्तिमान“* हा चित्रपट येत्या *२४ मे रोजी चित्रपटगृहात* प्रदर्शित होणार आहे ही माहिती सुद्धा प्रेक्षकांना सांगितली आहे . अर्थात आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी , प्रियदर्शन जाधव, अशा मराठीतील नामांकित कलाकारांच्या अभिनयाने सजलेला एक उत्कृष्ट मराठी चित्रपट पाहण्याची संधी मराठी प्रेक्षक नक्कीच सोडणार नाहीत *"कॉफी आणि बरंच काही ", "अँड जरा हटके " , "हंपी" आणि "सायकल"* सारख्या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखले जाणारे *दिग्दर्शक प्रकाश कुंटे* यांनी या नवीन प्रकल्पाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे, - *मला वाटतं “शक्तिमान“*चित्रपटाचे पोस्टर हे बरंच काही सांगून जातंय . हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहेच मात्र त्याबरोबर एक वेगळा संदेश देण्याचा सुद्धा मी प्रयत्न करत आहे . या चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटगृहात नक्कीच खिळवून ठेवेल . या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच आम्ही प्रेक्षकांसाठी आणत आहोत.**“शक्तिमान“ हा चित्रपट घरातल्या प्रत्येक लहान मुलं , त्यांची प्रेमळ आई , आणि त्यांचा सुपरहिरो बाबा साठी आहे "* *झी टॉकीजचा "शक्तिमान" चित्रपट: एक वेगळा आशय, एक नवा संदेश!**झी टॉकीजचे प्रमुख चॅनेल ऑफिसर (मराठी मूव्हीज क्लस्टर - झी टॉकीज, झी युवा आणि चित्रमंदिर) श्री बवेश जानवलेकर* यांनी 'शक्तिमान' चित्रपटाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, हा चित्रपट एक वेगळा आणि अनोखा आशय घेऊन येत आहे.

श्री बवेश जानवलेकर म्हणाले, "*झी टॉकीज समर्थित 'शक्तिमान' चित्रपटासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांची उत्तम कामगिरी, प्रकाश कुंटे यांचे दिग्दर्शन आणि एक उत्तम कथा या चित्रपटाला एक अविस्मरणीय अनुभव बनवतील.आपल्या मराठी प्रेक्षकांना नेहमीच चांगली कला आणि सार्थक विषयवस्तु असलेले चित्रपट आवडतात. 'शक्तिमान' मध्ये हे दोन्ही पैलू समाविष्ट असून, त्याबरोबर कुटुंबातील बंधाचीही झलक पाहायला मिळणार आहे. . 'शक्तिमान' २४ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण हा चित्रपट नक्कीच पाहा."***झी टॉकीज समर्थित ,मोशनस्केप एंटरटेनमेंट निर्मित आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित * *“शक्तिमान“* *२४ मे रोजी प्रदर्शित* होणार आहे. एक आकर्षक कथानक, प्रतिभावान कलाकार आणि एक अनोखा अनुभव देण्याच्या वचनामुळे, चित्रपटाने आधीच चाहते आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. उत्सुकता वाढत असताना, *'शक्तिमान'* मराठी चित्रपटसृष्टीला काय देणार आहे हे पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Share this article