ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या यांनी होळीचा पुरेपूर आनंद लुटला. श्वेता आणि नव्यासोबत होलिका दहनसाठी अमिताभ बच्चन आणि जया सामील झाल्यानंतर, पॉवर कपलने संध्याकाळपर्यंत होळीच्या गाण्यांवर नाचत आणि मौजमस्ती करत आनंद साजरा केला.
दोघेही होळीसाठी आपापल्या मित्रांमध्ये सामील झाल्या. पांढऱ्या पोशाखात या तिघांनी अनेक ग्रुप सेल्फी घेतले पण आराध्या आणि ऐश्वर्याच्या फोटोने मन जिंकले.
होळी पार्टीच्या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकमेकांचा हात धरून फोटोत दिसत आहेत. मुलगी आराध्याही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाली, ती तिच्या मैत्रिणींसोबत पोज देत होती.
एकमेकांवर रंग उडवण्याबरोबरच या जोडप्याने मुलांसोबत फेसमध्येही मजा केली. ऐश्वर्या रंगीत गुलालाने मढली होती. तिने फोटोसाठी पोज दिले आणि लेकीच्या मैत्रीणींसोबतही फोटो काढले.
बच्चन कुटुंबाशी भांडण झाल्याच्या बातम्यांदरम्यान, ऐश रविवारी रात्री उशिरा होलिका दहन पूजेसाठी कुटुंबासोबत दिसली. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर होलिका दहनाची छायाचित्रे पोस्ट केली होती.