ऐश्वर्या राय जितकी यशस्वी आणि सुंदर अभिनेत्री आहे तितकीच ती सुसंस्कृत देखील आहे. ती नेहमीच तिच्या कुटुंबाला महत्त्व देते आणि नेहमीच कुटुंबासोबत वेळ घालवते.
ऐश्वर्याने नुकतीच तिच्या दिवगंत वडीलांसाठी त्यांच्या जयंती निमित्त खास पोस्ट शेअर केली होती. त्यासाठी तिने सोशल मीडियावर अनेक जुने फोटो शेअर केले. या गोड फोटोत नात आराध्या आणि मुलगी ऐश्वर्यासोबत कृष्णराज राय यांची जबरदस्त बाँडिंग दिसत आहे.
ऐश्वर्याने तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत छोटी आराध्या तिच्या आजोबांसोबत हसताना आणि खेळताना दिसत आहे आणि तिचे आजोबा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दुस-या फोटोत ऐश्वर्या आजोबांच्या खांद्यावर डोकं ठेवून हसत आहे.
तिसऱ्या फोटोत ऐश्वर्या, आराध्या आणि अभिनेत्रीची आई वृंदा आहेत. त्यांच्या मागे तिच्या वडिलांचा फोटो आहे आणि फोटोला हार घातला आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करते, प्रिये प्रिय बाबा-आज्जा. सर्वात प्रेमळ, दयाळू, काळजी घेणारे, मजबूत, उदार आणि उदात्त... तुमच्यासारखे कोणीही नाही... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्ही नेहमी आमच्या आठवणींमध्ये आणि प्रार्थनांमध्ये असाल, आम्हाला तुमची खूप आठवण येते.
फॅन्स कमेंट सेक्शनमध्ये ऐश्वर्याचे सांत्वन करत आहेत आणि वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही असे म्हणत आहेत. त्याचवेळी काही चाहते ऐशचे कौतुक करत आहेत की ती इतकी साधी आणि आपल्या मुळाशी जोडलेली आहे.