Close

सिंघम अगेनमधला अजय देवगणचा फर्स्ट लूक अखेर समोर, जखमी सिंहासारखा दिसतोय अभिनेता (Ajay Devgn’s first look from Singham Again is finally out)

रोहित शेट्टीचा आगामी 'सिंघम अगेन' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांची पात्रे आणि फर्स्ट लूकचे पोस्टर्स एकापाठोपाठ एक रिलीज होत आहेत. 'सिंघम अगेन'मधील रणवीर सिंह, दीपिका पादुकोण करीना कपूरनंतर आता सिनेमाचा बाजीराव सिंघम म्हणजेच अजय देवगणचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर सिंघम अगेनमधील स्वतःचा पहिला लूक शेअर केला आहे. यामध्ये तो सिंहासारखा गर्जना करताना दिसत आहे. रोहित शेट्टीनेही हे पोस्टर आपल्या अकाउंटवर शेअर करत लिहिले आहे की, 'सिंह दहशत निर्माण करतो आणि जखमी सिंह विनाश करतो. सर्वांचा आवडता पोलीस ऑफिसर बाजीराव सिंघम परत आला आहेत.

https://twitter.com/ajaydevgn/status/1726837396829053303?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1726837396829053303%7Ctwgr%5Ea093cdcd12ee425f6cab55a8af650f6d7e964d21%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fentertainment%2Fsouth-movie%2Fncw-direct-tamil-nadu-police-to-registered-case-against-mansoor-ali-khan-for-sexiest-remark-on-trisha-krishnan%2Farticleshow%2F105371389.cms

हा २०२४ चा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल अशी अंदाजबांधणी काहींना आतापासूनच सुरु केली आहे. रणवीर सिंहनेही कमेंट करत म्हटले की, 'सिंघम अगेन'मध्ये बाजीराव सिंघम म्हणजेच अजय देवगण इतर ५ स्टार्ससोबत शत्रूंना वाचवताना दिसणार आहे.

'सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा चित्रपट आहे, यावेळी 'सिम्बा' म्हणजेच रणवीर सिंह आणि 'सूर्यवंशी' म्हणजेच अक्षय कुमारही सिंघमसोबत शत्रूंचा खात्मा करताना दिसणार आहे. तर एसीपी सत्या हे पात्र टायगर श्रॉफ साकारणार आहे.

Share this article