Close

‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या आधुनिक आवृत्तीचा उद्या टी.व्ही.वर प्रिमियर : अक्षयकुमार व टायगर श्रॉफची ॲक्शन कॉमेडी (Akshay Kumar And Tiger Shroff’s “Bade Miya Chhote Miya” To Premiere Tomorrow On TV : Modern Look Of Super Hit Action – Comedy)

बॉलीवूडचे दोन अॅक्शन स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आपल्या जबरदस्त अॅक्शन-कॉमेडीने परिपूर्ण असा ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास येत आहेत! अली अब्बास झफर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर सोनी मॅक्सवर २७ ऑक्टोबर २०२४ रोजी बघायला मिळणार आहे.

या प्रीमियरच्या आधी अक्षय कुमारने या चित्रपटात टायगर श्रॉफ बरोबर काम करण्याचा आपला अनुभव सांगितला. तो म्हणतो, “टायगर मला लहान भावासारखा आहे. आमच्या दोघांची लगेच गट्टी जमली होती. आम्ही तासन् तास एकत्र असायचो- अटीतटीची अॅक्शन दृश्ये करण्यापासून ते वॉलीबॉल आणि लुडो खेळून रिलॅक्स होण्यापर्यंत सारे काही आम्ही केले. त्याचे वागणे अत्यंत व्यावसायिक आहे आणि मी त्याच्याकडून बरेच काही शिकलो. मी प्रामाणिकपणे सांगतो की, टायगरसोबत शूटिंगचे दिवस मला खूप आठवणार आहेत! प्रत्यक्ष जीवनात तो खरोखर माझा ‘छोटे’च आहे.”

‘बडे मियां छोटे मियां’ ही त्या क्लासिक चित्रपटाची आधुनिक आवृत्ती आहे, ज्यात रोमांचक कहाणी, नेत्रसुखद दृश्ये आणि जबरदस्त अॅक्शन दृश्ये आहेत. यामध्ये दोन माजी सैनिकांची कहाणी आहे, जे जगाला एका भयानक धोक्यापासून वाचवण्यासाठी सैन्यात दाखल होतात.

https://youtu.be/PoD-ohcAjHw?si=lYajw3s9G52U2cZT

‘बडे मियां छोटे मियां’ म्हणजे अॅक्शन, कॉमेडी आणि नाट्य यांचे एक खुमासदार रसायन आहे, जे लहान-थोर सर्वांना नक्कीच भावेल!

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/