अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. अक्षयसोबत निर्माता दिनेश विजान होता.
अक्षय कुमार मेट्रोत फिरतोय याची कोणालाच कल्पना नव्हती. पण एका चाहत्याने त्याला ओळखले आणि गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केला.
VIDEO : #AkshayKumar𓃵 spotted with #dineshvijan in Mumbai Metro#AkshayKumar #skyforce pic.twitter.com/2MIEcRM767
— Akshay Kumar Fans Group (@AKFansGroup) January 11, 2024
मात्र, यावेळी अक्षय कुमारने मास्क आणि टोपीने चेहरा झाकला होता. या कारणास्तव त्याची ओळख पटली नाही. अक्षय कुमारचा हा साधेपणा पाहून चाहते प्रभावित झाले.
अक्षयचा हा व्हिडिओ एक्सवरील फॅन पेजने शेअर केला आहे. मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी अक्षय मुंबई मेट्रोचा प्रवास केला.
अक्षयची मेट्रोमध्ये बसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 2023 मध्येही तो अशाच पद्धतीने मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसला होता. मात्र, त्यावेळी तो त्याच्या 'सेल्फी' चित्रपटाचे प्रमोशन करत असताना इतर प्रवाशांशी साधत होता.