Close

आलियाचा ‘जिगरा’ या दिवशी होणार प्रदर्शित, जाहीर केली प्रदर्शनाची तारीख (Alia Bhatt Announce Release Date Of Film Jigra)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचे एकामागून एक हिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच आलियाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. आलियानं काही दिवसांपूर्वी जिगरा या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर हा चित्रपट कधी रिलीज होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अखेर आलियाने या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.

आलियाचा जिगरा हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून जिगरा या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये आलियाने जिगरा या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून, “11.10.2024 JIGRA See You At The Movies” अशी कॅप्शन दिली आहे.

जिगरा या चित्रपटामध्ये आलियासोबत वेदांग रैना हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. वेदांगने द आर्चीज या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आता त्याच्या जिगरा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Share this article