बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या वेगवेगळ्या भूमिकांतून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. आता लवकरच ती ‘अल्फा’ या हेरगिरीवर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महिलाप्रधान असलेल्या या चित्रपटात आलियासोबत बॉबी देओल आणि शर्वरी वाघही दिसणार आहेत. चित्रपटामध्ये आलिया गुप्तहेराच्या भुमिकेमध्ये दिसणार आहे. या भूमिकेसाठी आलियाने ४ महिन्यांची ट्रेनिंग घेतली आहे. केव्हाही न पाहिलेल्या भूमिकेत आलिया दिसणार आहे, त्यामुळे तिने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली असल्याचे बोलले जात आहे.
चित्रपटाच्या शुटिंगला ५ जुलैपासून सुरूवात झालेली असून काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाच्या टायटलची घोषणा केली होती. अल्फा चित्रपट हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स मधील हेरगिरीवर आधारित चित्रपट आहे. शिव रवैल दिग्दर्शित ॲक्शन थ्रिलर अशा या चित्रपटाची शुटिंग सुरू आहे.
दरम्यान, आलिया भट्ट या चित्रपटाशिवाय रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्याबरोबर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिचे अनेक चित्रपटही प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.