भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या तिच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सानियाचा घटस्फोट झाला असून तिच्या पतीनं पाकिस्तानच्या शोएब मलिकनं सना जावेद सोबत तिसरं लग्न केलं आहे.
या सगळ्यात सानिया ही चर्चेत आली आहे. दरम्यान, सानिया हिने २६ जानेवारी २०२४ रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत भारतीयांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतःचा एक खास फोटो पोस्ट करत सानिया हिने तिच्या मनातील भावना तिच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. सध्या सानियाच्या आयुष्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. सानियानं केलेल्या त्या पोस्ट चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यात एका पोस्टमध्ये सानियानं तिचा एक फोटो पोस्ट करत त्याला रिफ्लेक्ट असं म्हटलं आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये सानियानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिनं भारताप्रती नेहमीच आदर आणि आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यात नेहमीच अग्रेसर राहणार... असं म्हटलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनी सानियाला वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. यात चाहत्यांनी सानियाप्रती सहानुभूती दर्शवली आहे.
गेल्या वर्षापासून सानियाच्या वैवाहिक आयुष्यातील वादळाविषयी बोललं जात होतं. पहिल्यांदा अनेकांना त्या बातम्या अफवा असल्याच्या वाटल्या होत्या. तसेच हे दोन्ही सेलिब्रेटी एका रियॅलिटी शो च्या निमित्तानं हा स्टंट करत असल्याचेही सांगितले जात होते. अशातच काही दिवसांपूर्वी सानियाचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. एवढंच नाही तर, सानिया हिचा पहिला पती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक याने अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर शोएब याने तिसऱ्या पत्नीसोबत फोटो देखील पोस्ट केले. शिवाय खुद्द सानिया हिने शोएब याला तिसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
सानिया हिने कधीच स्वतःचं खासगी आयुष्य चाहते किंवा सोशल मीडियावर येऊ दिलं नाही. रिपोर्टनुसार, सानिया हिने इस्लाममधील खुला पद्धतीत शोएब याला घटस्फोट दिला आहे. सध्या सानिया तिच्या मुलासोबत दुबई याठिकाणी राहत आहे. सानिया कायम सोशल मीडियावर मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. सानिया हिचा मुलगा सध्या पाच वर्षांचा आहे. शोएब याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया पुन्हा भारतात येईल का आणि तिचा मुलगा इजहान भारतातच करियर करेल का? यावर चर्चे रंगली आहे.
(Photo : Instagram)