आपल्या देशात हॉकी व्हिलेज आहे, जिथून ६० पेक्षा जास्त खेळाडू आले आहेत. कर्नाटकची सावित्री अम्मा निराधार बिबट्यांच्या पिलांचा सांभाळ कशी करते. देशभरातून गोळा केलेल्या ४०० विविध तांदळाचे प्रकार ठेवलेली लायब्ररी, आसाम मधील एका विणकराने संस्कृतमधील सम्पूर्ण ७०० पानांची भगवद्गीता फक्त एकाच कापडावर विणली आहे....
अशा चमत्कारिक व विस्मयकारक घटनांचे दर्शन घडविणाऱ्या ‘ओएमजी ये मेरा इंडिया’ या कार्यक्रमाचा १० वा सिझन येत्या १२ फेब्रुवारी पासून हिस्ट्री टीव्ही १८ या चॅनेलवर प्रक्षेपित होणार आहे.
फक्त मनोरंजकच नाही तर प्रेरणादायी कथा यांचा समावेश असलेली ही मालिका आहे. या मालिकेचा सूत्रधार कृष्णा अभिषेक असून तिचे अनावरण गेटवे जवळील एका छोट्या जहाजावर झाले.