Close

श्रेयस तळपदेसोबत घडलेली भयंकर घटना अमेय वाघने कवितेत केली सादर, भावुक झाला अभिनेता ( Amey Wagh Present Special Poem For Shreyas Talpade At Zee Cine Gaurav Purskar)

नुकताच झी सिनेगौरव पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता अमेय वाघने या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला अभिनेता श्रेयस तळपदे सपत्निक हजर होता. त्यावेळी अमेयने श्रेयससाठी खास कविता सादर केली. जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कवितेने स्वता श्रेयस देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाला.

अमेयने म्हटलेल्या कवितेचे बोल होते की, “संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती… कारण, देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती. देव म्हणाला जा परत…हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजून धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे….. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे.”

डिसेंबर महिन्यात श्रेयसला हार्ट अटॅक आला होता. वेलकम टू द जंगल चे शूटिंग सुरू असताना त्याला अस्वस्थ वाटू लागलेले. घरी परतत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी १० मिनिटांसाठी श्रेयसचे हृदय बंद पडलेले असे म्हटले जाते. तेव्हा श्रेयसच्या पत्नीने प्रसंगावधान राखून त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केले व वेळीच उपचार सुरू केले. त्यावेळी श्रेयसला मुंबईतील सर्वसमान्य लोकांनीही मदत केलेली. त्या सर्वांचे श्रेयस व त्याच्या पत्नीने आभार मानलेले. आपला

Share this article