बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर सातत्याने धमक्या येत आहेत. नेटिझन्स त्यांना या धमक्या देत आहेत. बिंग बींना मिळालेल्या या धमक्यांचे रंजक कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. क्रिकेटच्या मैदानातील या शानदार विजयामुळे प्रत्येक भारतीय खूप आनंदी आहे. हा सामना 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी टीम इंडियाच्या शानदार विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. पण बिग बींनी टीम इंडियाला खूप मजेशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
ICC विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियाचे अभिनंदन करण्यासाठी सोशल मीडियावर लोकांची गर्दी झाली होती. इतर सेलिब्रिटींप्रमाणे बिग बींनीही त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) अकाऊंटवर लिहिले, "जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा आम्ही जिंकतो!"
अमिताभ बच्चन यांनी X (ट्विटर) वर ही पोस्ट लिहिल्यानंतर काही मिनिटांतच ही पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होऊ लागली. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या त्यांच्या ट्विटवर नेटिझन्सनी कमेंट करण्यास सुरुवात केली आणि रविवार, 19 नोव्हेंबर रोजी होणारा आयसीसी विश्वचषक अंतिम सामना न पाहण्याचा इशारा दिला.
बिग बी साठी नेटिझन्सनी लिहिलेल्या कमेंट्सवर एक नजर टाकूया-