बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. बिग बींनी मुंबईतील जुहू येथील प्रतीक्षा बंगला त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिच्या नावावर केला आहे. यानंतर आता श्वेता बच्चन प्रतीक्षाची नवीन मालकीण बनली आहे. बच्चन कुटुंबाकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी या वृत्ताला दुजोरा मिळाल्याचे सांगितले जात आहे.अमिताभ हे त्यांची मुलगी श्वेतावर खूप प्रेम करतात आणि अनेकदा ते आपल्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.
आपल्या मुलीवरचे प्रेम त्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रसंगी व्यक्त केले आहे. आणि आता त्यांनी आपल्या मुलीला आतापर्यंतची सर्वात महागडी भेट दिली आहे. प्रतीक्षा बंगला त्यांनी मुलीला दिला आहे. बिग बींनी पत्नी जया बच्चन यांच्या संमतीने हा निर्णय घेतला आहे.बिग बीनी श्वेताला दिलेल्या बंगल्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रिपोर्ट्सनुसार, 16,840 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या बंगल्याची किंमत 50.63 कोटी रुपये आहे. 9 नोव्हेंबर रोजी बच्चन कुटुंबाने हा करार केला आहे, ज्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क म्हणून 50.65 लाख रुपये भरले आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे तीन बंगले आहेत. 'प्रतीक्षा', 'जलसा' आणि 'जनक'.
यापैकी अमिताभ बच्चन 'जलसा'मध्ये जया बच्चन यांच्यासोबत राहतात. जलसाचे आतील भागही अतिशय आलिशान आहे. बिग बी अनेकदा त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करतात, ज्यामध्ये 'जलसा'ची झलक पाहायला मिळते. दर रविवारी ते जलसाबाहेर त्याच्या चाहत्यांना भेटतात.अमिताभ बच्चन यांच्याकडे तीन बंगले आहेत. 'प्रतीक्षा', 'जलसा' आणि 'जनक'. यापैकी अमिताभ बच्चन 'जलसा'मध्ये जया बच्चन यांच्यासोबत राहतात. जलसाचे आतील भागही अतिशय आलिशान आहे.
प्रतीक्षाबद्दल सांगायचे तर हा बंगला बच्चन कुटुंबाच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. याचा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर केला होता. त्यांनी असेही सांगितले की त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी या बंगल्याचे नाव 'प्रतिक्षा' ठेवले होते, जे त्यांच्या एका कवितेने प्रेरित होते, 'येथे सर्वांचे स्वागत आहे, कोणाचीही वाट पाहू नका'. याच ठिकाणी ते आधी आई-वडिलांसोबत राहत होते. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांचे लग्नही याच बंगल्यात झाले होते. याच कारणामुळे हा बंगला बिग बींच्या हृदयाच्या जवळ आहे, जो त्यांनी आता त्यांच्या मुलीला दिला आहे.