अभिनेत्री एमी जॅक्सनने तिचा बॉयफ्रेंड अभिनेता एड वेस्टविकसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर तिच्या अनोख्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत. ॲमी गेल्या दोन वर्षांपासून हॉलिवूड अभिनेता एड वेस्टविक याला डेट करत होती. आता ते दोघेही स्वित्झर्लंडच्या सुंदर बर्फाळ खोऱ्यात सहलीला गेलेले.
एमीने काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये एड तिला गुडघ्यावर बसून हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज करत असल्याचे दिसून येते आणि अभिनेत्रीनेही विलंब न करता त्याला हो म्हटले. पुढे अभिनेत्रीने काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. एमीने पांढरा पोशाख घातला आहे आणि एडने हिरवा रंगाचा पोशाख घातला आहे. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
याआधीही एमीने बिझनेसमन जॉर्ज पनायोटौशी लग्न केले होते आणि दोघांनाही एक मुलगा आहे - अँड्रियास. दोघेही 2020 मध्ये लग्न करणार होते पण त्यांचे ब्रेकअप झाले, पण आता एमी पुढे गेली आहे.
एडला गॉसिप गर्ल या सिरीजमुळे प्रसिद्धी मिळाली, तर एमीने दक्षिणेव्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपट केले आहेत, जसे की एक दीवाना था, 2.0, सिंग इज ब्लिंग इत्यादी. ॲक्शन थ्रिलर क्रॅकमध्येही एमी दिसणार आहे.
अनेक सेलेब्स आणि चाहते एमीला तिच्या एंगेजमेंटबद्दल शुभेच्छा देत आहेत.