अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या पहिल्या प्री-वेडिंगनंतर आता दुसऱ्या प्री-वेडिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. अनंत-राधिकाचा हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा चार दिवस रंगणार आहे. आजपासून याची सुरुवात होऊन १ जूनपर्यंत असणार आहे. पण हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा परदेशात मोठ्या थाटामाटात चक्क क्रूझवर पार पडणार आहे.
हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा ज्या क्रुझवर होणार आहे, त्याचे नाव 'सेलिब्रेटी असेंट' आहे. हे क्रूझ 5-स्टार सुविधांसह फ्लोटिंग रिसॉर्ट आहे. हे १ डिसेंबर २०२३ रोजी माल्टामध्ये लॉन्च झाले. या क्रूझची प्रवासी क्षमता ३२७९ आहे, परंतु लग्नाआधीच्या समारंभात ८०० पाहुणे असतील. त्यापैकी ३०० व्हीव्हीआयपी असतील. या पाहुण्यांची पूर्तता करण्यासाठी ६०० हॉस्पिटॅलिटी कर्मचारी असतील. युरोपियन टूर ऑपरेटर कंपनी अलोची ब्रदर्स त्याची व्यवस्था हाताळेल.
अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या पत्रिकेत ड्रेसकोड सांगण्यात आला आहे. आज ‘स्टेरी नाइट’ या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना वेस्टर्न फॉर्मल्स ड्रेसकोड देण्यात आला आहे. म्हणजे सलमान खान ते बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी या ड्रेसकोडमध्ये पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी ३० मेला ‘ए रोमन हॉलीडे’ नावाचा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमासाठी ड्रेसकोड टूरिस्ट चिक आउटफिट्स आहे. या दिवशी रात्री उशीरा एक पार्टी देखील होणार आहे.
३१ मे हा अंबानी कुटुंबासाठी सर्वात खास दिवस आहे. कारण यादिवशी मुकेश अंबानींची नात वेदाचा पहिला वाढदिवस आहे. मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश आणि श्लोकाची मुलगी वेदा आहे. दक्षिण फ्रान्सच्या कान्समध्ये हा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी रणबीर आलियापासून सर्व पाहुणे ब्लॅक टाइ ड्रेसकोडमध्ये दिसणार आहेत. अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचा शेवटचा दिवस म्हणजे १ जून इटलीत असणार आहे. या दिवशी सर्व दिग्गज पाहुणे इटालियन समर ड्रेसमध्ये पाहायला मिळणार आहेत. हा सर्व सोहळा ७५०० कोटींच्या क्रूझवर होणार आहे.