अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे आई होणार आहे. सध्या ती खूप स्टायलिश मॅटर्निटी फोटोशूट करत आहे. तिच्या पोस्टमध्येही ती बीचवर आपला बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.
अलानाने अतिशय स्टायलिश पोशाख परिधान केला आहे. तिने नेट को-ऑर्ड सेट घातला आहे. वरची बटणे उघडी ठेवून बिकिनी ब्लाउज परिधान केलेला दिसतोय. या फोटोंमध्ये अलाना तिचा बेबी बंप दाखवत आहे. तिच्या गळ्यात शंखांचा हार आहे.
एक दिवस आधी, अलानाने आणखी एका फोटोशूटची छायाचित्रे शेअर केली होती आणि ती लवकरच बाळाचे लिंग उघड करणार असल्याची माहिती दिली होती. अलानाने लिहिले - एकाच महिन्यात जेंडर रिव्हल, बेबी शॉवर आणि बेबी मून... मी प्लॅनिंगबद्दल थोडी चिंताग्रस्त आहे, पण मी खूप उत्साही सुद्धा आहे...
मात्र, ही पोस्ट बेकायदेशीर असल्याचे सांगत लोकांनी अलानाला ट्रोलही केले. परंतु काहींनी, आपण बाळाचे लिंग जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. अलाना अमेरिकेत राहते, तिचा नवराही परदेशी आहे, त्यामुळे तिथे बेकायदेशीर नाही, असेही सांगण्यात आले.
अलानाने असेही सांगितले होते की जेव्हा अनन्याला फोनवर सांगण्यात आले की ती आंटी होणार आहे, तेव्हा ती आनंदाने ओरडली आणि तिने असेही सांगितले की तिला आंटी नाही तर मावशी म्हणायचे. मी मावशी होणार आहे.