Close

माझ्या नवऱ्याची बायको‘नंतर अनिता दाते ‘माझ्या बायकोचा नवरा’ हे नवंकोरं नाटक घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Anita Date In New Marathi Natak ‘Majhya Baykocha Navara’)

अभिनेत्री अनिता दाते हिची 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका तुफान गाजली होती. या मालिकेत तिने साकारलेली राधिका सगळ्यांनाच भावली. या मालिकेनंतर आता अनिता दाते 'माझ्या बायकोचा नवरा' हे नवंकोरं नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाची संकल्पनाही भन्नाट असणार आहे. प्रेक्षक या नाटकाचं नाव ऐकूनच नाटक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन्सची ५९वी धमाकेदार नाट्यकृती 'माझ्या बायकोचा नवरा' ही आता लवकरच रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली असून, या नाटकाचा शुभरंभाचा प्रयोग येत्या रविवारी म्हणजेच २४ डिसेंबरला आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे होणार आहे.

या धमाल विनोदी नाटकाची निर्मिती कविता मच्छिन्द्र कांबळी, दिनू पेडणेकर, अभिजित देशपांडे, राहुल कर्णिक यांनी केली आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन सागर देशमुख यांनी केले असून सागर देशमुख, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. "माझ्या बायकोचा नवरा" हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दल आहेच पण, नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही बोलणारं आहे.

या नाटकाच्या नावानेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आधी 'माझ्या नवऱ्याची बायको' म्हणणारी अनिता दाते आता 'माझ्या बायकोचा नवरा' ही नवी कोरी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकात अनिता दाते हिच्यासोबत अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आणि सागर देशपांडे हे देखील नाटकात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही कथा या तिघांच्या नात्याभोवती फिरणार आहे. आता नाटकाची हटके संकल्पना अन् विषय म्हणून प्रेक्षक देखील त्याला पसंतीची पावती देतील, अशी आशा सगळ्यांनीच व्यक्त केली आहे.

Share this article