Close

बिग बॉसच्या घरात पती विकीच्या वाढत्या लोकप्रियतेचा अंकिता लोखंडेला वाटू लागलाय हेवा, सलमान खानसमोर दिली कबुली (Ankita Lokhande Confessed In Front Of Salman Khan, That She Is Getting Insecure With Vicky Jain’s Popularity)

अंकिता लोखंडेने वीकेंड का वारमध्ये सलमानला कबूल केले की तिचा पती विकी जैनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तिला असुरक्षित वाटत आहे.

बिग बॉस 17 या रिअॅलिटी शोमधील अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन यांचा प्रवास अडचणींनी भरलेला आहे. बिग बॉसच्या घरात हे जोडपे कधी रोमँटिक पोज देताना दिसले तर कधी त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित झाले. दोघेही बिग बॉसच्या घरात अनेकदा भांडताना दिसले किंवा एकमेकांना दोष देताना दिसले.

यावेळी वीकेंड का वारमध्ये सलमान खानने अंकिता लोखंडेला थेरपी रुममध्ये बोलावून तिच्या समस्या विचारल्या. तसेच, तिचा नवरा विकी जैनच्या खेळाचे खूप कौतुक केले. सलमान खानने अंकिताला सांगितले की तू घरात फक्त विकी विकी करत राहा. अशा प्रकारे तू गेम जिंकू शकणार नाही. तू तुझा खेळ तुझ्या पद्धतीने का खेळत नाही?

सलमान खानने अंकिताला विचारले की तुला विक्कीसोबत काही समस्या आहे का? किंवा कदाचित तुझ्या पतीला शोमध्ये मिळणारे लक्ष आणि लोकप्रियता पाहून तुला हेवा वाटतो का.

या प्रश्नाच्या उत्तरात हसत अंकिता म्हणते की, कदाचित तसे असेल. सलमानसमोर दिलेल्या या कबुलीवरून नेटिझन्स अंकिताला ट्रोल करत आहेत. अंकिताच्या कबुली जबाबावर सोशल मीडिया यूजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत.

एका यूजरने लिहिले - अंकिता दीदी, इतर स्पर्धकांवरुन काय असुरक्षित फिल करशील, तू स्वतःच्या नवऱ्याचा जळत आहेस.

कमेंटमध्ये तिला कोणी जळूबाई म्हणत आहे तर कोणी लिहिलंय की नवऱ्याचा मत्सर करणं ही चांगली गोष्ट नाही. कुठे गेले हे पवित्र रिश्ता?

Share this article