Close

अंकिता लोखंडेच्या घरचे गौरी गणपती, नवरा विक्की जैनसोबत केली मनोभावे पुजा ( Ankita Lokhande Gauri Ganpati Celebration With Husband Vicky Jain)

गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैन आता गौरीच्या भक्तीत रमले आहेत. अभिनेत्रीने गौरी पूजेचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

10 दिवस चालणाऱ्या गणेश चतुर्थीनिमित्त अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी त्यांच्या घरी बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं होतं.

या जोडप्याने मोठ्या थाटामाटात बाप्पाचे (बाप्पा विसर्जन) विसर्जनही केले.

गणपती विसर्जनानंतर अंकिता लोखंडेने आता आपल्या घरी माता गौरीच्या पूजेचे आयोजन केले आहे.

अंकिता लोखंडेचे संपूर्ण कुटुंब आणि तिच्या जवळच्या मित्रांनीही गौरी पूजनात सहभाग घेतला.

अंकिताने गौरी पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री पूजा करण्यात मग्न दिसत आहे.

पूजाच्या खास प्रसंगी अभिनेत्रीने पारंपारिक लूक फॉलो केला. तिने जांभळ्या रंगाची साडी आणि सोनेरी दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

एका फोटोमध्ये अंकिता लोखंडे तिच्या सासूसोबत माता गौरीची आरती करताना दिसत आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये अंकिता लोखंडे माता गौरीचा मेकअप करताना दिसत आहे, तर पुढच्या फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या वडिलांच्या फोटोजवळ उभी असलेली दिसत आहे.

अभिनेत्रीची ही फोटो सिरीज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते या फोटोंना लाईक आणि कमेंट करत आहेत.

Share this article