अभिनेता अर्जुन कपूर प्रमाणेच त्याची बहीण अंशुला कपूर देखील नेहमी चर्चेत असते. अंशुला चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आता अंशुला लवकरच एका शोमध्ये एंट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अंशुलाला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात, अशातच आता अंशुला लवकरच एका शोमध्ये एंट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अंशुला लवकरच ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. यंदा या शोचं होस्टिंग अनिल कपूर म्हणजे अंशुलाचे काका करणार आहेत.
‘बिग बॉस ओटीटी 3’ या शोसाठी मिका सिंग, जावेद जाफरी, शिवांगी जोशी, हर्षद चोप्रा, भव्य गांधी, सई केतन राव, प्रतीक्षा होनमुखे शीजन खान, तनुश्री दत्ता, त्रिशाला दत्त, सना सुलतान, अरहान बहल, शेहजादा धामी आणि आहाना देओल या कलाकारांना शोसाठी संपर्क करण्यात आला होता. यातच अंशुला कपूरच्या नावाचाही समावेश आहे.
टाईम्स नाऊच्या ताज्या वृत्तानुसार, अनिल कपूरची भाची अंशुला कपूर आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर यांनाही शोसाठी अप्रोच करण्यात आलं आहे. अंशुला या शोसाठी उत्साही असून तिने होकारही दिल्याची माहिती आहे.
लोकांना अंशुलाबद्दल फारशी माहिती नाही, त्यामुळे त्यांना तिला पाहण्यात रस येईल असा विचार करून तिला शोमध्ये घेतलं जात आहे. या शोच्या तयारीसाठी अंशुला भाऊ अर्जुन कपूरचा सल्लाही घेत आहे. अंशुलाविषयी सांगायचं तर तिने २०१२ मध्ये GOOGLE मध्ये ५ महिने नोकरी केली आहे. शिवाय तिने HRX मध्ये ऑपरेशन मॅनेजर म्हणून देखील काम केलं आहे. ती ब्रँड प्रमोशनमधूनही लाखोंची कमाई करते.