अनुपम खेर यांना चित्रपटात येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अखेर महेश भट्ट दिग्दर्शित 'सारांश' या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, हा सिनेमा त्यावेळी सुपरहिट ठरलेला. अभिनेत्याने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत या चित्रपटातील एक प्रसंग शेअर केलेला. तेव्हा अनुपम फक्त २८ वर्षांचे होते, पण त्यांना पडद्यावर एक वयस्कर व्यक्तिरेखा साकारायला मिळाली.
अभिनयाचे वेड असलेल्या अनुपम खेर यांनी या भूमिकेसाठी आनंदाने होकार दिला. त्यांनी आपल्या चित्रपटातील भूमिकेची तयारी सुरू केली. पण अचानक त्यांना समजले की या चित्रपटात महेश भट्ट आपल्या जागी संजीव कुमारला कास्ट करणार आहेत. या बातमीने अनुपम यांना मोठा धक्का बसलेला. त्यांनी तेव्हा मुंबई सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.
मुलाखतीत अनुपम खेर यांनी असेही म्हटले होते की, त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पण जाण्यापुर्वी महेश भटट् यांना सुनवून जायचे असे त्यांनी ठरवले. त्यासाठी ते थेट महेश भट्ट यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना अशा काही गोष्टी म्हटल्या की दिग्दर्शकही चकित झाले.
अनुपम यांनी महेशला म्हटले की - तू तुझ्या या चित्रपटात सत्या विषयी बोलतोयस, पण तुझ्या स्वतःच्या जीवनात सत्य नाही, मी ब्राह्मण आहे आणि तुला शाप देतो... असे ते म्हणत असतानाच महेश यांनी त्यांना अडवले. आणि मग 'सारांश'चं शूटिंग सुरू झालं. चित्रपटात एका वृद्ध जोडप्याची कथा दाखवली. या जोडप्याने आपला एकुलता एक मुलगा गमवल्याने त्यांची जगण्याची इच्छा मेलेली असते. पण अचानक सिनेमाच्या कथानकात एक ट्विस्ट येतो. या चित्रपटासाठी अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तर महेश भट्ट यांना उत्कृष्ट कथेसाठी अनेक पुरस्कार मिळाले.