Close

दुसरं लग्न केल्यानंतर अरबाजने सोशल मीडियावरुनही मलायकाची केली हकालपट्टी, सोशल मीडियावर केले अनफॉलो (Arbaaz Khan unfollows ex-wife Malaika Arora on Instagram After 2nd Marriage with Sshura Khan)

अरबाज खानने काही दिवसांपूर्वी अचानक दुसरे लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. गर्लफ्रेंड जॉर्जिया अॅड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, त्याने मेकअप आर्टिस्ट शूरा खानला डेट करायला सुरुवात केली. 24 डिसेंबर रोजी त्याने शूराशी लग्न केले. त्याचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी, त्याने मलायका अरोरासोबत लग्न केले होते, जिच्यापासून 2016 मध्ये घटस्फोट झाला. शुराशी दुसरे लग्न केल्यानंतर अरबाजने सोशल मीडियावर माजी पत्नी मलायकापासून स्वतःला दूर केले आहे आणि तिला अनफॉलो केले आहे.

अरबाज आणि मलायका वेगळे होऊन जवळपास सात वर्षे झाली असली तरी घटस्फोटानंतरही त्यांची मैत्री कायम होती. त्यांचा मुलगा अरहानसोबत त्यांना अनेकदा एकत्र पाहिले गेले. असे असूनही मलायका अरबाजच्या लग्नाला आली नाही. आता असे समोर आले आहे की अरबाजने मलाइकाला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे.

अरबाज खान त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फक्त १२७ लोकांना फॉलो करतो, त्यात त्याचे भाऊ सलमान खान आणि सोहेल खान आणि त्याचा मुलगा अरहान खान यांचाही समावेश आहे. पण आता मलायका त्याच्या फॉलोअर्सच्या यादीतून गायब आहे. घटस्फोटानंतर अरबाजने मलाइकाला अनफॉलो केले होते पण 2017 मध्ये त्याने तिला पुन्हा फॉलो करायला सुरुवात केली. पण पुन्हा एकदा मलायका त्याच्या फॉलोअर्सच्या यादीत दिसत नाही. अरबाजने दुस-या लग्नानंतर तिला अनफॉलो केल्याचा अंदाज यूजर्स लावत आहेत, मात्र अरबाजने सोशल मीडियावर मलायकापासून दूर का ठेवले याची पुष्टी अद्याप झालेली नाही. मलायका अजूनही अरबाजला फॉलो करते.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केले आणि दोघांना बॉलिवूडचे पॉवर कपल म्हटले जात होते, परंतु लग्नाच्या 19 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले आणि 2017 मध्ये दोघांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला.

Share this article