अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे लव्ह बर्ड्स पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. बॉलिवूडचे हे पॉवर कपल वेगळे झाल्याची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्यांच्या कमिटमेंट्सच्या मुद्द्यांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले आहे, परंतु मलायका आणि अर्जुन यांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे इंडस्ट्रीतील लाडके जोडपे आहेत. अनेकदा दोघांनाही त्यांच्या नात्यामुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. पण लव्ह बर्डने आजपर्यंत कोणाचीच पर्वा केली नाही.
अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी मलायका अरोराने 2019 मध्ये तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत तिचे नाते अधिकृत केले. दोघांमधील प्रेम वाढू लागले. जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर वेगळे झाल्याची चर्चा काही काळापासून सोशल मीडियावर होती. मात्र याबाबत मलायकाने काहीही सांगितले नाही आणि अर्जुननेही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी काही काळासाठी त्यांच्या नात्यातून ब्रेक घेतला होता. लवकरच दोघांमध्ये समेट झाले. पण कमिटमेंटच्या मुद्द्यांमुळे 2 महिन्यांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले.
जोडप्याच्या ब्रेकअपचे आणखी एक कारण म्हणजे जोडीदारांपैकी एकाला लग्न करून सेटल व्हायचे आहे, तर दुसऱ्या जोडीदाराला याची शाश्वती नाही. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. आतापर्यंत मलायका आणि अर्जुनने ब्रेकअपच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.