बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे, तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता अर्जुन कपूर आपल्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांचा भाग बनला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान, ब्रेकअपच्या चर्चा रंगत असताना, मलायका सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसली. अभिनेत्रीने सुट्ट्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये असलेल्या मिस्ट्री मॅनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता मलायका पुन्हा मुंबईत परतली आहे. याच दरम्यान, अर्जुन याने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चर्चांना अधिक उधाण आलं आहे.
अर्जुन कपूर याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अर्जुन कपूर म्हणतोय, ‘सकारात्मक असणे म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तुम्हाला हव्या तशा घडतील असे नाही; पण एक गोष्ट लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. परिस्थिती कशीही असली तरी चालेल, तुम्ही ठिक असायला हवे…’ असं अभिनेता म्हणाला आहे. आता अर्जुन कपूरने पोस्ट केलेल्या या ओळींचा संबंध त्याच्या आणि मलायका अरोराच्या नात्याबद्दल आहे, असा अंदाज नेटकऱ्यांकडून लावला जात आहे.
सांगायचं झालं तर, मलायका हिचा मिस्ट्री मॅनसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्जुन याने पोस्ट शेअर केली आहे. मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीने मिस्ट्री मॅनसोबत पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मिस्ट्री मॅनचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. फोटोनंतर अर्जुन – मलायकाचं नातं देखील चर्चेत आलं आहे.
नुकताच अर्जुन कपूर याचा वाढदिवस झाला. वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्याच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. वांद्रे येथील राहात्या घरी अर्जुन कपूर याच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्याने कुटुंबिय आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते. पण अभिनेत्री मलायका अरोरा मात्र पार्टीतून गायब होती. शिवाय मलायका हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुन याला शुभेच्छा देखील दिल्या नाहीत.
अर्जुन – मलायका यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, २०१९ मध्ये मलायका – अर्जुन यांनी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली. ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे