Close

अर्जुन तेंडुलकरची या मराठमोळ्या अभिनेत्रीसाठी खास पोस्ट….(Arjun Tendulkar Shared A Special Post For This Marathi Actress)

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुन देखील क्रिकेट क्षेत्रात त्याचं करिअर करतोय. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स या टीमचा भाग आहे. मात्र, अर्जुन आता क्रिकेटमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची एका मराठमोळ्या अभिनेत्रीसाठी असलेली एक खास पोस्ट... चला तर पाहुया नक्की अर्जुननं कोणत्या अभिनेत्रीसाठी ही पोस्ट केली आहे.

अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. अर्जुननं ही पोस्ट अभिनेत्री काजल काटेसाठी केली आहे. अर्जुननं काजल आणि तिच्या नवऱ्याचा फोटो शेअर करत त्या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काजलच्या नवऱ्याचं नाव प्रतिक आहे. तर त्या दोघांना शुभेच्छा देत काजल आणि प्रतिकचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं कॅप्शन त्यानं दिलं आहे. याशिवाय त्यानं लाल रंगाचं हार्ट इमोटीकॉन वापरलं आहे.

काजोलच्या नवऱ्याविषयी बोलायचे झाले तर प्रतिक कदम हा मुंबई इंडियन्स या टीमसाठी काम करतो. ते दोघं अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. काजोलविषयी बोलायचे झाले तर तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. काजोलला 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतून ती घरा-घरात पोहोचली होती.  त्यानंतर काजोल ही 'मुरांबा' या मालिकेत दिसली. या मालिकेतही काजोलनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर अचानक तिनं या मालिकेतून काढता पाय घेतला आणि मालिकेतून बाहेर निघाली.

दरम्यान, अर्जुन तेंडुलकरविषयी बोलायचे झाले तर त्याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेक पोस्ट शेअर करताना दिसतो. तर त्याचे इन्स्टाग्रामवर 589K फॉलोवर्स आहेत. त्याच्या पोस्टमध्ये सगळ्या क्रिकेटचे व्हिडीओ किंवा ट्रेनिंगचे व्हिडीओ पाहायला मिळतात.

Share this article