Close

अर्शदची पत्नी मारिया गोरेट्टीने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमधील ‘त्या’ फोटोवर व्यक्त केली तीव्र नाराजी (Arshad Warsi’s Wife Criticise Ambanis For Using ‘Rescued Elephant’ As Prop: ‘Just Heartbreaking’)

गेल्या चार-पाच दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचीच चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा थाटामाटात पार पडला. या भव्य सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने विविध क्षेत्रांतील बड्या मंडळींना आमंत्रित केले होते. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, इवांका ट्रम्प, जगप्रसिद्ध गायिका रिहानापासून ते बॉलीवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतानाच त्यातील एका फोटोवर अभिनेता अर्शद वारसीची पत्नी नाराज झाली आहे. अर्शदची पत्नी मारिया गोरेट्टीने तो फोटो शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मारियाने जो फोटो शेअर केला आहे, त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रंप फोटोसाठी पोझ देताना दिसून येतेय. तिच्या मागे एक हत्ती उभा असल्याचं पहायला मिळतंय. अंबानींच्या कार्यक्रमात हत्तीला ‘प्रॉप’ म्हणून वापरल्याप्रकरणी अर्शद वारसीच्या पत्नीने दु:ख व्यक्त केलंय.

तिने लिहिलंय, ‘मी अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमातील हा फोटो पाहून हैराण झाले आहे. असं कोणत्याही प्राण्यासोबत होऊ नये. विशेषकरून त्या प्राण्यांसोबत तर अजिबात होऊ नये ज्यांना वाचवलं गेलंय आणि ज्यांचं पुनर्वसन केलं गेलंय. हे अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारं चित्र आहे. एका हत्तीला इतक्या लोकांच्या गराळ्यात आणि इतक्या आवाजात एका प्रॉपसारखं उभं केलं गेलंय.’

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये बऱ्याच थीम होत्या. त्यापैकीच एक थीम अंबानींच्या ‘ॲनिमल रेक्स्यू सेंटर वनतारा’वर आधारित आहे. या प्री-वेडिंग कार्यक्रमाला बच्चन कुटुंबीयांसह शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, करीना कपूर, सैफ अली खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह यांसह संपूर्ण बॉलिवूडच अवतरलं होतं. आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप सिंगर रिहानासुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होती.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/