Close

आयेशा खानवर वयाच्या ९ व्या वर्षी एका अनोखळी व्यक्तीने केलेली जबरदस्ती, बिग बॉसच्या घराबाहेर येताच धक्कादायक खुलासा ( Ayesha Khan was molested by a stranger at the age of 9, a shocking revelation as she came out of the Bigg Boss 17 house)

आज बिग बॉस १७ चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. यंदाचा सीझनही दरवेळी प्रमाणे वादांनी रंगलेला होता. यावेळी कपल्सची भांडण जास्त दिसली. यामध्ये मुनव्वर फारुखी आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानदेखील सहभागी झालेली. शोमध्ये आयेशाने अनेक धक्कादायक खुलासे केले. तसेच मुनव्वरवर अनेक गंभार आरोप देखाल केले.

काही दिवसांपूर्वीच आयेशा शोमधून बाहेर पडली होती. त्यानंतर तिने सिद्धार्थ काननला मुलाखत दिली. ज्यात आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. तसेच तिच्यावर वयाच्या ९ व्या वर्षी विनयभंग झाल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली की, 'त्यांनी मला आवाज दिला. मी मागे फिरुन बघितले. तेव्हा त्यांनी मला एक पत्ता विचारला. तो मला माहित होता. ते मला, बेटा मला तिथे घेऊन चल म्हणाले, मी ही त्यांच्यासोबत गेले.

आयशा खान पुढे म्हणाली, 'आम्ही त्या इमारतीत पहिल्या मजल्यावर गेलो. तिथून खाली उतरत असताना त्यांनी मला पायऱ्यांवर ढकलले. मग ते माझ्यावर जबरदस्ती करू लागले. त्या क्षणी मला समजत नव्हते की काय होत आहे.

'काहीतरी चुकीचे घडत आहे हे मला समजलेले, पण नक्की काय तेच समजत नव्हते. ९ वर्षाच्या मुलीला कसे समजेल? मला ओरडता येत नव्हते. मी काहीच करू शकत नव्हते. त्यांचा हात माझ्या तोंडावर होता आणि ते मला थांबवत होते. मी एवढंच म्हणत होते की, माझी आई तिथे उभी आहे, काका प्लीज मला जाऊ द्या.

'मी विनवणी करुनही त्यांनी मला सोडले नाही. मग अचानक देवाच्या कृपेने त्याच्या मनात काय आले माहीत नाही त्यांनी मला तिथे उभे राहायला सांगितले आणि म्हणाले,  मी दोनच मिनिटात आलो. ते बाहेर जाताच मी स्वतःला आयशा, इथून पळून जा असे म्हणाली.

Share this article